स्थैर्य, दि.१३: मोठ्या जोखीमींच्या मालमत्तांकडे ओढा वाढला, तसा ऑगस्ट २०२० च्या सुरुवातीपासून सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या येनचे मूल्य कमी व्हायला सुरुवात झाली. यामुळे जेपीवायआयएनआरचे प्रमाण २.४३ टक्क्यांनी वाढले व जेपीवाययुएसडीचे प्रमाण फ्लॅट स्थितीत राहिले. इतर सुरक्षित मालमत्तेच्या डॉलर निर्देशांकात याच काळात ०.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. येणा-या कालावधीत जपानी येनचे अवमूल्यन कायम राहिल की यात सुधारणा होईल याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विश्लेषक श्री वकारजावेद खान.
जपानचा कोव्हिड-१९ उतरणीच्या वाटेवर: जपानने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला. देशाने ३ ऑगस्ट रोजी याचे उच्चांकी शिखर गाठले. तिथे दैनंदिन रुग्णसंख्या १९९८ पर्यंत गेली. तेव्हापासून रुग्णसंख्येत घसरण दिसून सध्या देशात दररोज ५०० रुग्ण निघत आहेत. दरम्यान, जपान सरकारने सप्टेंबरच्या आर्थिक अहवालात निर्यात, कारखाना उत्पादन, नोकरी या संदर्भात आपला दृष्टीकोन सुधारला. मात्र अर्थव्यवस्थेचे एकूण मूल्यांकन अद्याप बदललेले नाही.
वाहन आणि कारचे सुटे भाग तसेच धातूच्या उत्पादनात वाढ झाल्याने ऑगस्टमध्ये कारखान्यातील ऑर्डर सलग तिस-या महिन्यात वाढून १.७ टक्क्यांवर आल्या. वर्षाच्या सुरुवातीच्या काळात जपानच्या जागतिक व्यापाराचे भागीदार आणि विशेषत: चीनकडून मागणी कमी झाली, तेव्हा विषाणूमुळे सरकारला लॉकडाऊन लादावे लागले. त्यामुळे जागतिक व्यापार उत्पादनावर परिणाम झाला.
सध्याच्या विस्ताराच्या दृष्टीकोनातून पाहता, जपानचे अर्थ मंत्रालय, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला सप्टेंबरमध्ये ५.७ टक्क्यांची उत्पादन वाढ अपेक्षित आहे. ऑक्टोबरमध्ये २.९ टक्क्यांची अपेक्षा आहे. तथापि, ग्राहक आणि व्यवसायिकांमध्ये विषाणूची दुसरी लाट कायम असल्याने यात सावधगिरी बाळगली जात आहे. म्हणूनच सरकारने मासिक अहवालात ग्राहक खर्च आणि उद्योग खर्चाबाबतचा अंदाज कमी केला. अर्थव्यवस्थेतील रोजगाराचा दरही हळू हळू वाढत आहे. मात्र एकूणच परिस्थितीत उदासीनता आहे.
बँक ऑफ जपान (BOJ) अल्ट्रा-इझिंग आर्थिक धोरण कायम राखणार: बीओजेचे गव्हर्नर हारुहिको कुरोडा यांनीदेखील देशाच्या आर्थिक आणि किंमतीच्या परिस्थितीबद्दल अनिश्चितता व्यक्त केली आहे. कारण जागतिक वृद्धीवर विषाणूचा प्रभाव अजून कायमच आहे. कुरोडा म्हणाले, “ अर्थव्यवस्था मध्यम स्थितीच्या दिशेने वाटचाल करत आहे, मात्र ते अधिक स्पष्टपणे म्हणाले की, आरोग्य संकटामुळे आर्थिक स्थितीवर उपायांसाठी केंद्रीय बँक मदतीचा ओघ कायम ठेवण्यास तयार आहेत. जेणेकरून कॉर्पोरेट वित्तपुरवठ्यावर ताण येणार नाही. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात बीओजेने मालमत्ता खरेदीचा वेग वाढवून नव्या कर्ज सुविधा उपलब्ध करून प्रोत्साहन वाढवले होते. परंतु तेव्हापासून पॉलिसी निधी स्थिर ठेवला आहे.
आउटलुक: विषाणूच्या लसीच्या बातम्या आणि त्या बाजारात येण्याच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर जगभरातील जोखिमीची भावना हेलकावे घेत आहे. जगातील मध्यवर्ती बँका बाजारात तरलता आणत असून यामुळे मागील काही महिन्यांत मोठ्या जोखिमीच्या मालमत्तांचे प्रमाण वाढले आहे. ठोस आर्थिक सुधारणेशिवाय जोखीमीच्या मालमत्तांतील ही लाट टिकून राहणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक सुधारणेत आणखी घट झाल्यास जपानी येनसारख्या सुरक्षित मालमत्तेची मागणी वाढू शकते.
तर दुसरीकडे, जपानमधील औद्योगिक उत्पादन आणि निर्यातीत काही प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. मात्र विषाणूच्या भीतीने ग्राहक खर्चात उदासीनताच दिसून येत आहे. आयएमएफच्या आकडेवारीनुसार, जपानची अर्थव्यवस्थादेखील २०२० मध्ये ५.२ टक्क्यांनी आकुंचन पावेल आणि त्यानंतर २०२१ मध्ये ती ३ टक्क्यांनी हळू हळू विस्तारत जाईल. लसी येण्याच्या कालावधीतील अनिश्चितता लक्षात घेता, पुढील काही महिन्यात येनची मागणीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जेपीवायआयएनआर (CMP: 69 ) हा लोलकाच्या खालच्या ६८ व्या स्थानापासून ऑक्टोबर २०२० च्या अखेरीस ७० या उच्चांकी स्थानापर्यंत जाईल, असा अंदाज आहे.