कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १७ : साताऱ्यात १७ ते २६ जुलै दरम्यान दहा दिवस लॉकडाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या आकड्याने दोन हजारी पार केल्याने,कोरोना साखळी तोडण्यासाठी त्यातील पाच दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. लगतच्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातही लॉकडाऊन सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना ‘कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार? असा प्रश्न विचारत ‘घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या’. असा सामाजिक संदेश छायाचित्रातून दिला आहे.

उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,सुधीर महामुनी,अधिक्षक हेमंत खाडे, दिपक मगर यांच्या उपस्थितीत याबाबतची अनेक पोस्टर्स प्रकाशित करुन त्यांनी माध्यमिक विभागातही लावली आहेत, तसेच सोशल मीडियावर प्रकाशित केली आहेत, त्यापैकी ‘कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार?’ हे त्यांनी पोस्ट केलेले छायाचित्र खूपच व्हायरल झाले आहे.

कोरोना विषाणू

तुमच्या घरी येणार नाही

जोपर्यंत तुम्ही त्याला

आणायला बाहेर जात नाही.डाॅक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे

माणसांतील देवांना सलाम, कोरोनाची

साखळी

तोडायचीय…

कुटूंबाला आणि देशाला

कोरोनापासून वाचवायचय…,

लक्षात ठेवा ही लढाई जिंकायची आहे

हारायची नाहीय…,

बहिरे व्हा

अफवांना थारा देऊ नका

अफवा

कोरोनापेक्षा

भयंकर

असू शकतात.

कुटुंबासोबत घरात की

एकटं रुग्णालयात

तुम्ही ठरवायचं…!, कोरोनावर एकच

उपाय

टाकू नका घराबाहेर

पाय, कंसापेक्षा क्रूर

आणि

रावणापेक्षा मायावी आहे

कोरोना.

ठेवूया एक मीटर सुरक्षित अंतर

कोरोना होऊ दे छूमंतर.

अशा शब्द व चित्ररुपी संदेशांचा त्यात समावेश आहे.यापुर्वी क्षीरसागर यांची पाचवर्षीय कन्या रुचिताचे लॉकडाऊन एक व दोन काळातील ‘स्टे अॅट होम’चे सामाजिक संदेश देणारे दोन स्वतंत्र व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!