राज्यातील हॉस्पिटल्सच्या समस्या सोडवणार; खा.शरद पवार यांची ग्वाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १७: महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील हॉस्पिटल्सच्या समस्यांबाबत संबंधीत यंत्रणा व हॉस्पिटल्स संघटना यांची संयुक्त बैठक लावून सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली आहे.

हॉस्पिटल वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष व निकोप हॉस्पिटल फलटणचे प्रख्यात ह्रदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ, गिरीराज हॉस्पिटल बारामतीचे डॉ. रमेश भोईटे, लाईफ लाईन हॉस्पिटल फलटणचे डॉ. राजवैद्य यांनी नुकतीच गोविंद बाग बारामती येथे खा. शरदराव पवार यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील विविध हॉस्पिटल्स, डॉक्टर्स यांच्या अडचणीविषयी माहिती देऊन त्या सोडविण्यासाठी शासन, प्रशासन पातळीवर संबंधीत यंत्रणांशी चर्चा घडवून आणून योग्य मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबतही यावेळी खा. शरद पवार यांना माहिती देऊन केंद्र व राज्य शासनाच्या या दोन्ही योजना राबविताना संबंधीत रुग्णावर करण्यात येणार्‍या वैद्यकीय उपचारासाठी दिली जाणारी रक्कम अत्यंत कमी असून त्या रकमेत आजच्या सर्व खर्च वाढत असताना उपचार करणे परवडणारे नसल्याने सदर दोन्ही योजनेतील कॅश लेस रक्कम वाढवून मिळावी अशी आग्रही मागणी करताना आज खाजगी व शासकीय रुग्णालयात आकारण्यात येणारी रक्कम आणि केंद्र व राज्य शासनाकडून या दोन्ही योजना राबविणार्‍या हॉस्पिटल्सना दिली जाणारी रक्कम अत्यल्प असल्याचे निदर्शनास आणून देत त्यामध्ये भरीव वाढ केल्यास खर्‍या अर्थाने गरीब व गरजू रुग्णांना योग्य व मोफत (कॅश लेस) उपचाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी निदर्शनास आणून दिले.

कोरोना महामारीच्या काळातही या रुग्णालयांनी मोठी मेहनत घेऊन प्रामाणिकपणे रुग्णांवर उपचार केले, रुग्णालय सुविधा अपुर्‍या असल्याचे वाढत्या रुग्ण संख्येनंतर लक्ष्यात येताच या हॉस्पिटल्सनी बेड व अन्य साधने, सुविधा तातडीने उपलब्ध करुन घेऊन हॉस्पिटल्सच्या विविध विभागांचे विस्तार करुन सर्व रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून देत या उपचारासाठी शासनाने निश्‍चित केलेली रक्कम अत्यंत कमी असून त्या रकमेत योग्य वाढ मिळाली पाहिजे असे सांगून सदर रक्कम विमा कंपनी देणार असल्याने शासनावर खर्चाचा कोणताही बोजा पडणार नसल्याचे खा. शरद पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!