फलटण तालुक्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण व संवर्धन करणार : आमदार सचिन पाटील; साखरवाडीत “एक विद्यार्थी; एक वृक्ष” अभियानाचा शुभारंभ


दैनिक स्थैर्य | दि. 26 जुलै 2025 । फलटण । झाडे लावा झाडे जगवा या ब्रीद वाक्य नुसते बोलण्यापुरते न घेता ते कृतीमध्ये उतरावे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. लक्ष्मीतरू वृक्षाचे मानवी आरोग्यास महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन फलटण तालुक्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र या वृक्षाची लागवड झाली पाहिजे. याच बरोबर सध्याच्या परिस्थितीत झाडांची संख्या कमी झालेले याचा परिणाम जसा पर्यावरण वर होत आहे त्याच पद्धतीने मानवी आरोग्यावर देखील होत असल्याने वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. फलटण तालुक्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधला पाहिजे असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

साखरवाडी विद्यालय साखरवाडी ता. फलटण येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक विद्यार्थी एक वृक्ष अभियान अंतर्गत ६६ हजार लक्ष्मीतरू रोपांची रोपण करण्याचा भव्य संकल्पाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते झाला.

आगामी काळात फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या माध्यमातून सर्वत्र वृक्षारोपण करू आणि आपला फलटण तालुका सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने सर्वच वर्गातील लोकांनी पुढे यायला हव असे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी यावेळी केले.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, यावेळी महानंदचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे – पाटील, आर्ट ऑफ लिविंगचे डॉ.माधवराव पोळ, महाराष्ट्र राज्य वृक्ष लागवड व संगोपनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, माजी पंचायत समिती सदस्य सागर कांबळे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिंदे , साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले, साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जगदाळे, साखरवाडी शिक्षण संस्था संचालक राजेंद्र शेवाळे, युवा नेते निवृत्ती खताळ, राजाभाऊ पवार, डॉ. ओंकार सरगर व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!