
दैनिक स्थैर्य | दि. 01 एप्रिल 2025 | फलटण | तालुक्यातील आदर्की येथे असणाऱ्या रत्नशील निंबाळकर या युवकाचा गेल्या काही दिवसांपूर्वी क्रूर पद्धतीने खून करण्यात आला, याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून आरोपीला तातडीने पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
आदर्की येथील रत्नशिल निंबाळकर यांच्या घरी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांत्वन पर भेट दिली. त्यावेळी कुटुंबीयांशी चर्चा करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
यावेळी बोलताना माझी खासदार रणजितसिंह म्हणाले की, रत्नशील निंबाळकर यांची गेल्या काही दिवसांपूर्वी क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. यामध्ये असणाऱ्या आरोपीला कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. यासोबतच निंबाळकर कुटुंबियांच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार असल्याचे मत सुद्धा यावेळी व्यक्त केले.