दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२४ | दुधेबावी | दुधेबावी गावातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिपक चव्हाण यांना लीड देणार असल्याचे राजे गटाचे युवा नेते विकास सोनवलकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सोनवलकर म्हणाले कि; दुधेबावी ता. फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे झाली आहेत. तसेच तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे. तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात धोम बलकवडीचे पाणी आणल्यामुळे दुधेबावी गावातील दुष्काळ हटला आहे.
गेली पंधरा वर्ष आमदार दिपक चव्हाण यांनी भरपूर विकास कामे के ली असून दुधेबावी गावालाही भरपूर निधी दिला आहे.त्यामुळे आगामी काळात गावातील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार दिपक चव्हाण यांना निवडून देणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील सर्व तरुण वर्गाला बरोबर घेऊन दुधेबावी गावातून दिपक चव्हाण यांना लीड देणार असल्याचे युवा नेते विकास सोनवलकर यांनी सांगितले.