
स्थैर्य, सातारा, दि. 11 सप्टेंबर : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरासह क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी बैठकीचे आयोजन करावे. यासाठी माझे निश्चितच योगदान राहील, असे आश्वासन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव निखंज यांनी दिले.
खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांची विमान प्रवासावेळी कपिलदेव यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी उदयनराजे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
या भेटीत कपिलदेव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या नाबाद 175 धावांच्या अविस्मरणीय खेळीला उजाळा मिळाला. या खेळीचे आजही जगभरातील क्रिकेटप्रेमी कौतुक करतात. सातारा आणि महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. यासंदर्भात विशेष बैठक आयोजित केल्यास योग्य ते योगदान देण्याची तयारी कपिलदेव यांनी दर्शवली.