विधानसभेला महायुतीच्या सोबतच राहणार; मलठणमधील महिलांचा निर्धार; अशोकराव जाधव यांची माहिती


दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑगस्ट 2024 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली सातारा येथील महिला सन्मान सोहळ्यासाठी मलठण म्हणजेच प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, व प्रभाग क्रमांक 5 मधील महिला रवाना झाल्या आहेत. यावेळी आमच्या घराला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यामुळे हातभार लागला असल्याचे विविध महिलांनी व्यक्त केले असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.

सातारा येथील मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमास ज्या महिलांना भाऊबिजेचे लाडकी बहिण योजनेतून 3000 रुपयांची भाऊबीज मिळाली आहे. त्या सर्व महिला जाताना त्या सर्व महिलांचे स्वागत करून माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!