
दैनिक स्थैर्य | दि. 03 एप्रिल 2025 | नवी दिल्ली | फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांसाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकारी संस्थांसाठी विविध योजना असून त्यासाठी नक्कीच आपले सहकार्य राहणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कायमच फलटणच्या विकासात्मक कामासाठी आग्रही असतात. आगामी काळामध्ये सुद्धा फलटणच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य राहील, असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी काल दि. ०२ एप्रिल रोजी केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांचा यथोचित सन्मान श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळाच्या वतीने केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांची जिल्हा बँकेच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी सदिच्छा भेटीचे नियोजन हे बँकेचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार नितिनकाका पाटील यांनी केले होते. त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सहकारी संस्थांच्या विविध माहिती दिली.
श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांना सहकारी क्षेत्रातील माहिती आहे. त्यांनी यापूर्वी फलटण बाजार समितीचे सभापती, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक यांच्यासह विविध सहकारी संस्थांवर काम केले आहे.
यावेळी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार नितिनकाका पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांच्यासह बँकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.