प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार : अशोकराव जाधव


स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : प्रभाग ७ मधील भाजप उमेदवार अशोकराव जाधव यांनी आपल्या प्रचारात विकास आणि अनुभवी नेतृत्वावर भर दिला आहे. ते मतदारांना आवाहन करत आहेत की, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची साथ आणि माझा स्वतःचा पालिका कामकाजाचा अनुभव या सर्वांची सांगड घालून आपल्याला प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे.

अशोकराव जाधव यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, रणजितदादांनी अल्प कालावधीतही शहर विकासासाठी भरपूर काही केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून लवकरच आणखीन मोठ्या योजना शहरात येणार आहेत.

या योजनांमुळे येत्या काळात शहराचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलणार आहे. विकासाच्या या मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी पालिकेत महायुतीला संधी देणे आवश्यक आहे, असे ते मतदारांना समजावून सांगत आहेत.

ते पुढे म्हणाले, विकासाच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सामील झाले पाहिजे. अनुभवी उमेदवाराला संधी दिल्यास प्रभागाची प्रगती निश्चित होईल. त्यामुळे मतदारांनी भाजप उमेदवारांना साथ द्यावी, अशी विनंती अशोकराव जाधव करत आहेत


Back to top button
Don`t copy text!