माणगावात उत्साहात पार पडला रानभाजी महोत्सव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२३ | कुडाळ |
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी सह्याद्री गट (कृषी महाविद्यालय, दापोली) यांच्या माध्यमातून माणगावात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा पार पडल्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सवास भेट देऊन पाहणी केली व पाककलेतील पदार्थांचे कौतुक केले.

३१ ऑगस्ट २०२३ रोजी माणगाव गावामध्ये कृषी महाविद्यालय दापोलीच्या कृषी सह्याद्री गट व कृषी विभाग, माणगाव यांच्यामार्फत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाक-कला स्पर्धेचे आयोजन केले गेले. सदरच्या कार्यक्रमात तब्बल ४० विविध रानभाज्या प्रदर्शित केल्या गेल्या होत्या.

लोकांना विविध रानभाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचावे, हे या महोत्सवाचे उद्दिष्ट होते. या प्रदर्शनामध्ये पाककला स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

या कार्यक्रमास कुडाळ – मालवण मतदारसंघातील आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या महोत्सवास एकूण २०० हून अधिक लोकांनी भेट देऊन रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. पी. पी. पाटील सर (उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी) सौ. अश्विनी घाटकर (तालुका कृषी अधिकारी, कुडाळ), श्री. प्रवीण कोळी (कृषी अधिकारी, कडावल), अमोल करंदीकर (कृषी अधिकारी), श्रीमती गायत्री राऊत (कृषी अधिकारी, माणगाव), श्री. विनय घोंगे (कृषी अधिकारी, कुडाळ), सौ. भोसले मॅडम (सरपंच), डॉ. हेमंत बोराटे सर, डॉ. प्रविण झगडे सर, डॉ. संदीप गुरव सर (केंद्रप्रमुख) आणि डॉ. रणजीत देवहरे सर (कार्यक्रमाधिकारी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!