
दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
राजे गटाचे मार्गदर्शक व निंभोरे गावचे मा.ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोकराव आण्णासो रणवरे यांच्या पत्नी सौ.रुक्मिणी अशोकराव रणवरे (माई) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज रात्रौ १० वाजता निंभोरे, ता.फलटण येथे होणार आहे.
सौ. रुक्मिणी रणवरे यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणवरे कुटुंबियांचे त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.