राम निंबाळकरांकडून निंबळक येथील ओढ्याचे खोलीकरणासह रुंदीकरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. 19 : निंबळक ता.फलटण गावच्या तीन बाजूंनी ओढा असून एका बाजूने कॉनॉल आहे. अशा स्थितीत ओढयात साचलेल्या गाळामुळे तुंबलेले सांडपाणी आणि दुसऱ्या बाजूने कॉनॉलच्या पाण्याची दलदल यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असताना निंबळक गावचे सुपुत्र उदयोजक राम निंबाळकर स्वच्छता दूत म्हणून धावून आले. त्यांनी स्वखर्चाने ओढयाला भरावा देत त्याचे खोलीकरणासह रूंदीकरण केल्याने गावचे आरोग्य आबाधित राहण्यास मदत झाल्याने ग्रामस्थांनी उद्योजक राम निंबाळकर यांचे आभार मानले. राम निंबाळकर यांनी ह्या पूर्वी लाखो रूपये खर्च करून ग्रामदैवत श्री निमजाई देवी मंदीराचा जिर्णोध्दार केला. भव्य दिव्य अशी ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करण्यातही त्यांचे योगदान आहे.

गावाच्या बाजूने असलेल्या ओढयात गाळ साचल्याने त्याच्या प्रवाह मार्गात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दुर्गंधी पसरत होती. परिणामी गावाचे आरोग्य धोक्यात आले होेते. अशा स्थितीत उद्योजक राम निंबाळकर यांनी सुमारे वीस लाख रूपयांच्या स्वखर्चातून हेळ ते स्मशानभूमी आणि युवराज शिंदे घर ते स्मशानभूमी असा सुमारे दीड किलोमीटरच्या ओढयाचे खोलीकरण व रुंदीकरण करून मजबूतीसाठी भरावा घातला आहे. तसेच गुणवरे रस्ता ते कुंभारवस्ती पर्यंतच्या अर्ध्या किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली असताना या रस्त्याचे खडीकरण आणि दरम्यानच्या पूलाचे काम सुरू आहे.

गावाच्या सभोवतालचा परिसर वेडयाबाभळींनी वेढला असताना ही झाडे काढून  परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. याकामी गेली महिनाभर त्यांच्या पोकलेनच्या सहाय्याने गावातील स्वच्छता मोहीम सुरू असल्याचे सरपंच सौ. शशिकला उत्तमराव कापसे (काकी) यांनी सांगितले.

निंबळक गावचे सुपुत्र, उद्योजक राम निंबाळकर यांचे गावावर फार प्रेम आहे. गावच्या विकास कामात त्यांचा  नेहमीच सहभाग असतो. गावच्या लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ते नेहमीच सढळ हाताने मदत करतात. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला जिल्हा परिषद शाळा निंबळकला सुमारे २५ हजार रुपयांचा धनादेश देतात. गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी त्यांचे विशेष प्राधान्य असते. राम निंबाळकर यांच्या सारखे दानशूर व्यक्तीमत्व आपल्या गावात असावे असे प्रत्येक गावातील लोकांना वाटते.

राम निंबाळकर यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवून ओढयाच्या केलेल्या या कामामुळे पाण्याचा विसर्ग सुरळीत होऊन निंबळक  गावाचे आरोग्य आबाधित राहण्यास मदत होणार असल्याने पंचायत समिती सदस्य संजय कापसे, सरपंच सौ. शशिकला कापसे यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!