लोकसभेला, विधानसभेला ज्याचे डिपॉझिट जप्त झाले त्याची नोंद का घ्यायची ? : खासदार शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा : सध्या इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. लॉकडाऊनमुळे लोक गप्प आहेत म्हणूनच केंद्रशाशन गैरफायदा घेवून इंधन दरवाढ करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी केला. दरम्यान लोकसभेला, विधानसभेला ज्याचे डिपॉझिट जप्त झाले आहे त्याची का नोंद घ्यायची अशा शेलक्या शब्दात आ. गोपीचंद पडळकर यांना फारसे महत्त्व देत नसल्याचे त्यांनी सूचित केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार शनिवारी सातारा दौर्‍यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या पेट्रोलचे दर रोजच वाढत चालले आहेत. याबाबत पत्रकारांनी छेडले असता खा. पवार म्हणाले, पेट्रोल व डिझेलची दरवाढ तर रोज होत आहे. इतिहासात असं कधी पाहिलं नाही. देश संकटात आहे. परंतु, केंद्र सरकार आवश्यक वस्तू महाग करत आहे. इंधन दरवाढ म्हणजे काय फक्त गाडीच्या टाकीत पेट्रोल जास्त पैसे द्यावे लागतात, एवढ्यापुरते मर्यादित नाही. इंधन महागले तर मालाच्या वाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होवून त्याची झळ आपल्या घरापर्यंत येते. लॉकडाऊनमुळे जनता गप्प आहे, म्हणूनच केंद्रशासन गैरफायदा घेत असल्याचे ते म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला पडळकरांच्या विधानाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ज्याचे लोकसभेला, विधानसभेला डिपॉझिट जप्त झाले त्या व्यक्तीबद्दल काय बोलणार. त्यांना लोकांनीच नाकारले आहे. त्याची नोंद का घ्यावी. त्यामुळे आ. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

गलवान खोर्‍यात चीनच्या घुसखोरीबाबत खा. शरद पवार म्हणाले, गलवान परिसरात भारत रस्ता तयार करतोय. सियाचीन भागातील दळवण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर चीनी सैन्य घुसखोरी करत आहे. अशा घटना वारंवार घडतात. परंतु, 1993 मध्ये मी संरक्षणमंत्री असताना चीनला गेलो असताना सरंक्षण मंत्र्यांसमवेत चर्चा केली होती. त्यावेळी या परिसरातून सैन्य कमी करण्याचा तसेच दोन्ही सैन्यांनी शास्त्राचा वापर करायचा नाही असा करार झाला होता. सध्या परिस्थिती सध्याच्या परिस्थितीत देखील कुठेही दोन्ही देशांच्या सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेले नाही. जर सीमेत चीनी सैन्याने घुसखोरी केली तर त्यास हुसकावून लावण्यासाठी धक्काबुक्कीसारखे असे प्रकार घडले. यामध्येच केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे. चिने 1962 नंतर भारताचा 36 हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला हे सत्य आहे. आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आलं दिसतंय. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षितेच्या प्रश्‍नावर कोणीही राजकारण करू नये.

कोरोनाच्या या काळात कारखाने बंद असणे हे चिंताजनक असल्याचे या सगळ्या गोष्टींचा फटका राज्याचा तिजोरीवर झाला आहे. यामुळे राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज घ्यावे लागले आहे. लोकडाऊनमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रात विविध उद्योगांत काम करणारे परराज्यातील मजूर त्यांच्या मनामध्ये कोरोनोविषयीची भीती निर्माण झाली होती. विशेषतः मुंबईत कोरोना वाढत असल्याने ही भीती अधिक बळावलेली होती. लोकांच्या मनातील भीती जावी, लोकांना कोरोनासोबत जगायचे आहे, याचा विश्‍वास निर्माण व्हावा, यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. महाराष्ट्रातील माध्यमे फारच जागृत असल्याने पुणे, मुंबई, औरंगाबादमधील कोरोनाची परिस्थिती अधिक ठळकपणे पुढे आली. यातूनच लोकांनी भीती घेतली असल्याची कोपरखळीही खा. पवार यांनी काढला.

शेती क्षेत्रातील अभ्यास असणारे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेण्याबाबत आम्ही कमिटमेंट केली होती. माझी जबाबदारी होती मी पूर्ण केली आहे.  नागरी सहकारी बँका व मल्टीस्टेट बँका यांच्यावर रिझर्व बँकेचे पूर्ण नियंत्रण आणण्याचा केंद्रशासन केंद्र शासनाने घेतलेला निर्णय हा सहकार चळवळीसाठी बाधक ठरू शकतो सहकार चळवळ संकुचित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील खासदार पवार यांनी केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!