का द्यावा, घ्यावा तीळगुळ ….. !!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १४ : भारतात दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करणारा दिवस विविध नावानी साजरा केला जातो. मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. ‘उत्तरायण’ म्हणजे (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांची संधी आहे.

भोगी सण हा हवामान बदला बरोबर आहाराचा बेस बदलण्यासाठी महत्वाचा ठरतो. पूर्वीचे लोक हवामानाला पुरक आहार घेत असत …. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगभाज्या, फळभाज्या यांंची तीळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे महत्व विशेष आहे.थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.

यातून एकच … लोकांच्या पोटात तीळ आणि गुळ जावेत हाच उद्देश…. पोटातली उष्णत: जावून … स्वभावातला मीत आहारानी गोडवा यावा हे प्रतिकात्मक आहे. चला तर मग….. हे घ्या तिळगुळ ….. !! आपण कायमच गोड बोलतो …. मीत आहार कायम घ्या.

– युवराज पाटील,
मा. जिल्हा माहिती अधिकारी,
सातारा


Back to top button
Don`t copy text!