समाजातील लोक पक्ष्यांच्या घरट्याची काळजी घेतात, शेतातील जुंधळ्याची कापणी करताना पक्षाचे घरटे असलेले जुंधळ्याचे ताट तसेच ठेवले जाते, जमिनीची नांगरणी करताना शेतात अंड्यावर बसलेल्या टिटवीची जागा सोडून नांगरणी करतो. पक्ष्यांच्या घरट्याची इतकी काळजी घेणारा समाज असा कसा वागतो.यावर विश्वास बसत नाही. पाखरांची काळजी घेणारा माणुसकीला पारखा होतोच कसा?
माणसांच्या विवेकशीलपणा, सहनशीलता, संयमीपणा याला धक्का पोहचला की तो बिथरलाच म्हणून समजावं. मायेनं जवळ करावं अन् त्यानंच दगा द्याव. असे घडल्यावर ताक फुंकून प्यावं लागतं. माणूस दया, क्षमा, शांती याला धरुन जीवनाचार संभाळतो असतो. आश्यावेळी अस्मितेला तडा गेला की तो घसरण्याची शक्यता नकारता येत नाही.
पशू पक्ष्यांना जीव लावणार मनुष्य पशू पेक्षा ही खतरनाक वागतोच कसा. याचा विचार केल्यावर लक्ष्यात येतं की मानसिक जडणघडण कशी झाली. यावर तुमचे मत ठरते. नशेच्या भरात माणूस नरड्याला नख लावण्यास मागेपुढे न पाहणार एवढा मायेस पारखा होतोच कसा. कारण त्यांच्यावरील झालेल्या अन्यायस न्याय न मिळणे. समजून न घेणं. किंमत न देणं. फक्त कामापुरता वापर करणं. जाईल तिथं मानहानी. यामुळे तो बिथरतो.
माया लावणं जेवढं अवघड आहे. तेव्हडंच तोडणं सोपं आहे. माणुसकी जपणं हेच सध्याच काळात अपेक्षित आहे. चला तर माणुसकीचा गोफ तयार करुन अनेक नात्यांची गुंफण करु या. नक्षीदार गोपाच्या गुंफणीत माणुसकीचा घट्ट धागा ओवून त्यांचे साक्षीदार बनावे.
आपलाच धागा – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१