कोरोनाची दुसरी लाट एवढी जोमाने का आली? आणि आता काय करायला पाहिजे?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०७: कोरोना हा गेली दीड वर्षे आपल्या बरोबर राहिला आहे. मागच्या वर्षी (२०२०) ऑक्टोबर मध्ये पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला होता आणि दुसरी लाट ही डिसेंबर मध्ये येणे अपेक्षित होते पण ती सुदैवाने आलीच नाही आणि जानेवारी मध्ये कोरोना संपतोय की काय असे वाटू लागले. पण ही वादळा पूर्वीची शांतता होती असे आता म्हणावे लागेल.

दुसरी लाट एवढ्या जोमाने का आली –
१. जानेवारी मध्ये कोरोना संपला की काय असे सर्वांना वाटू लागले आणि म्हणूनंच कुठली ही काळजी न घेता परत पूर्ववत जीवन सुरू झाले की जे स्वाभाविक होते. मास्क वापरायचा कंटाळा आला होता आणि म्हणूनच तो वापरायचे बहुतांशी बंद झाले.
सॅनिटायझर वापरणे कमी झाले आणि सामाजिक अंतराचा तर काही विचारूच नका. गर्दीत ते पाळणे शक्यच नाही. एकंदर आपण सर्व गाफील झालो.

२. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा वर्षभर खूप काम करून थकलेली होती आणि साहजिकच त्यांच्या कडून काही निर्बंध हे सैल झाले.

३.अशातच लसीकरण १६ जानेवारीला सुरु झाले. भारतात तयार झालेली सिराम इन्स्टिट्यूट नी बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस प्रथमतः अत्यावश्यक सेवेत काम करत असणाऱ्या व्यक्तींना (फ्रंट लाईन वर्कर्स) देण्यात आली, नंतर ६० वायवरील जेष्ठांना दिली गेली आणि मग ४५ लोकांना दिली गेली. त्यातच भारत बाईटेक नी कोव्हेक्झिन ही पूर्णपणे भारतीय बनावटीची लस उपलब्ध केली आणि हा खरच अभिमानाचा क्षण आपल्यासाठी आहे. जसे जसे लसीकरण ड्राईव्ह वाढत गेला तसे लस घेण्यासाठी गर्दी होऊ लागली, तिथे परत त्रिसूत्री चा फज्जा उडाला. लस घेण्यासाठी लांब च्या लांब रांगा दिसू लागल्या.

४. लसीकरण नंतर पेलट्झमन इफेक्ट (Peltzman Effect) नावाचा इफेक्ट आपल्यात दिसून आला. त्या मुळे आपण लसीकरण झाल्यानंतर किंवा त्याच्या विचारानेच पूर्णपणे सुरक्षित झालो असे वाटून एक फाजील आत्मविश्वास आला आणि परत त्रिसूत्री चा फज्जा उडाला.

५. जे मास्क लावात होते त्यांचे तरी मास्क कुठे नाकावर होते. १०० वेळा मास्क ला हात लावून तो बोलताना खाली घेतला जात होता आणि होतोय, रोजच्या रोज तो धुतला जात नव्हता, या सर्वांचा फायदा कोरोनानी घेतला.

तर प्रियजन हो कोरोना हा आता आसमंतात फिरतो आहे, तो घरा-घरात पोहोचला आहे. कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबधित होत आहेत. या वेळी सगळ्यात आश्चर्याची बाब अशी आहे की, जी लोक मागच्या लाटे मध्ये पोसिटीव्ह आली नव्हती ती या वेळी आवर्जून पोसिटीव्ह येताना दिसत आहेत.

जे जेष्ठ कुठेच बाहेर गेले नाहीत आणि घरात बसून आहेत त्यांना पण दुसऱ्या लाटे मध्ये कोरोनानी सोडले नाहीये. या लाटेचा प्रादुर्भाव खूप झपाट्याने होतो आहे आणि लँग्स अफेक्शन मोठ्या प्रमाणात होते आहे. हृदय विकाराचे प्रमाण ही वाढले आहे.

आता आपण काय करायला पाहिजे

१ . त्रिसूत्री ही काटेकोर पणे पाळलीच पाहिजे.
मास्कला शक्यतो हात लावू नका, असा मास्क घाला की जो नाक आणि तोंड पूर्ण झाकेल. मास्कला हात लावायचा असेल तर सॅनिटायझरने हात साफ करूनच मास्कला हात लावा अन्यथा कोरोनाचे जंतू नाकात नक्की जाणार आहेत.

२. प्रतिकार शक्ती ही आपली पहिली ढाल आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती उत्तम आहे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तरी त्रास होणार नाहीये. ती कशी वाढेल या कडे लक्ष द्या मग नित्यनियमाने व्यायाम, सकस आणि घरी शिजवलेला आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

३. कोविड लस घ्या
ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांनी दुसरा डोस पहिल्या डोस नंतर एक ते दीड महिन्यात जरूर घ्यावा आणि स्वतःला सुरक्षित करावे.
एक महत्वाची सूचना ज्या वृद्धांनी (६०वया वरील) अजून लस घेतली नाही त्यांनी कृपया आत्ता लस घेऊ नका कारण असे दिसून आले आहे की तुम्ही जर window period मध्ये असाल आणि तुम्ही लसीचा पहिला डोस आत्ता घेतलात तर बरेच वृद्ध patients हे ‘Cytochine Storm’मध्ये जाताना दिसत आहेत की जे त्यांच्या जीवाला घातक होऊ शकते. त्यामुळे जेष्ठहो सावधान – ज्यांनी अजून पहिला डोस घेतला नाही त्यांनी आत्ता लसीकरण करून घेऊ नये. हो पण ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांनी दुसरा डोस शेड्युल प्रमाणे नक्की घ्यावा.

४. सकारात्मक राहा. कोरोना हा एवढ्यात आला आहे. तो भले ही आत्ता वरचढ झाला असेल आपण शांत पणे आणि सय्यमानी ह्या ओव्हर्स मग त्या का असेनात खेळून काढल्या पाहिजेत. नॉट आऊट राहणे महत्वाचे आहे. आपली विकेट पडली तर सगळा खेळच संपून जाईल. ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ हे दोन महत्वाचे शब्द आपल्याला साईबाबांनी बहाल केले आहेत. ही पण वेळ जाईल आणि चांगले दिवस येतील. यात आपण एकटे नाही आहोत सर्व समाज ह्या कठीण फेज मधून जात आहे.

५. परोपकारी वृत्ती ठेवा
जेव्हा जमेल तेव्हा आणि जशी जमेल तशी दुसऱ्यांना मदत करा. तसे केल्याने समाजाचे आणि स्वतःचे कल्याणच होईल.

जाता जाता आपण म्हणूयात
“कोरोना तू कीतीही वरचढ हो,
आम्ही तुला मुळीच घाबरणार नाही!
आम्ही आहोत महाराजांचे मावळे,
चारिमुंडया चित केल्यावाचून तुला, आम्ही शांत बसणार नाही !!

– डॉ. प्रसाद जोशी,
अस्थीरोग शल्य-चिकित्सक,
जोशी हॉस्पिटल प्रा. ली.
फलटण


Back to top button
Don`t copy text!