गुजरात यूपीचे भोंगे कमी झाले त का ? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राज ठाकरे यांना सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । सातारा । “गुजरात, उत्तर प्रदेशात भोंगे कमी झाले का? याची राज ठाकरेंनी चौकशी करावी” राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.लोक राज ठाकरे यांना ओळखून आहेत. गुजरात आणि उत्तरप्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झालेत का? याची माहिती राज ठाकरे यांनी घ्यावी असा टोला पाटील यांनी लगावत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .

राष्ट्रवादी पक्षाची परिसंवाद यात्रा साताऱ्यात आली असून याची सुरुवात वाई तालुक्यातुन झाली आहे. यावेळी जयंत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा या राजकारणावर भाष्य केलं.

राज्यात सध्या राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा सुरु असून, पक्ष संघटनेशी संवाद हा या परिसंवाद यात्रेचा उद्देश असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा हे सुरु आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झाले आहेत का? याची चौकशी करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना सल्लाही जयंत पाटलांनी दिला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीत राज ठाकरे महाविकास आघाडीला डिस्टर्ब करू शकणार नाही. लोक राज ठाकरे यांना ओळखून असल्याचा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.


Back to top button
Don`t copy text!