फलटण नगरपालिकेतील महिलेची छेडछाड करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर नक्की कोणाचा वरदहस्त ? : नगरसेवक अनुप शहा


स्थैर्य, फलटण : फलटण नगरपालिकेमध्ये काही दिवसापूर्वी एका महिला कर्मचारीने एका पालिका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला. सदर महिलेने सुमारे महिन्यापूर्वी फलटण नगरपालिकेत तो कर्मचारी मला त्रास देत असल्याची तक्रार केलेली होती. परंतु पालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कोणाच्या वरदहस्तामुळे त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेला आहे. 

चतुर्थ श्रेणी कामगाराला कोणत्या अधिकारात लिपिक या पदावर बसवले आहे?, लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष फलटण नगरपालिकेत पदावर असताना जर सावित्रीच्या लेकीचं जर सुरक्षित नसतील तर फलटण मधील सर्व सामान्य महिलांची सुरक्षा हि राम भरोसेच आहे का? असे प्रश्न हि, नगरसेवक अनुप शहा यांनी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केलेले आहेत. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!