स्थैर्य, सातारा, दि. 18 : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बायोमेडिकल वेस्ट पुण्याच्या आसपासचे प्लॅन्ट सोडून, सातारा नगरपरिषदेच्या प्लॅटला पाठविणेस काणी परवानगी दिली शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुटी असताना नेमके त्याच दिवशी आणि रात्रीच्या वेळेसच पुणे महानगरपालिकेच्या मालकीचे हे ट्रक का आले. त्याला आयुक्तानी परवानगी दिली कशी. लॉकडावूनच्या पाचव्या टप्यात, जिल्हाबंदी असताना, अत्यावश्यक आणि रितसर पासेस असलेल्या व्यक्ती आणि वाहनाशिवाय अन्य कोणास परवानगी नसताना, अश्या परिस्थितीत शिरवळवरुन हे ट्रक सातारा जिल्हा हद्दीत आले कसे. शिरवळ चेक पोस्ट वरील संबंधीत पोलीस अधिकारी, जिल्हाप्रशासन यांनी कोणती चौकशी करुन, सदरचे ट्रक सोडले.
बायोमेडिकल वेस्ट सारख्या सेन्सेंटीव्ह प्रश्नाबाबत पुण्याच्या आणि सातारच्या मा . पालकमंत्रीमहोदय यांना माहीती देण्यात आली होती का , या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी होवून , दोषी कोणीही असो त्यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहीजेत , अशी मागणी सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली आहे . श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतत्वाखाली काम करीत असताना , आमच्या नेत्यांसह सातारकर नागरीकांच्या भावनांशी आजपर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी नगरसेवक कधीही खेळलेली नाही . सातारकर नागरीकांशी प्रतारणा करणे आमच्या नेत्यांच्या आणि आमच्या रक्तात नाही असे नमुद करुन , उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की , सातारा नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असलेल्या कै.प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज यांच्या कार्यकाळातच पार्टीच्या मैला वाहतुकीच्या प्रथेला आळा घालण्यात आला . त्यानंतर सन २००२ साली सातारा विकास आघाडीची एकहाती सत्ता आल्यावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या इतिहासात कचराकुंडी मुक्त शहर ही संकल्पना राबविणेस सुरूवात केली , शहरात कचरा साठुच नये म्हणून घरोघरी जावून , कचरा उचलण्याकरीता घंटागाड्या सुरु केल्या , मंडई सारख्या ठिकाणी ट्रैक्टर ट्रॉली लावून कचरा उचलण्यास सुरुवात केली , टप्याटप्याने आरोग्य विभागाकरीता नवीन डंपर प्लेसर , जेसीबीची , खरेदी केले , बायोमडीलक वेस्ट डिस्पोजल प्लॅन्ट नेचर इन नीड चे सहकार्यान उभारण्यात आला . घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा डेपावर कचरा विलगीकरण करणे, कच-यापासून सात निर्माण करणे, कचरा डेपोच्या जागेला सर्व बाजुने कपौंड बांधणे, अशी विविध कामे लोकहित डोळयासमोर ठेवून, सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन, करण्यात आलेली आहेत. कचरा शहरात ठिकठिकाणी साठुच नये अशी संकल्पना राबविणारी त्यावेळी महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येणा – या नगरपालिकामध्ये सातारा नगरपरिषदेचा अग्रक्रमाने समावेश होता . सातारा विकास आघाडीने सुरु केलेले अभिनव उपक्रम पुढे यशस्वी ठरले . श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकहित लक्षात घेवून राबविलेल्या या उपक्रमामधुन , नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्याविषयी असणारी तळमळ , काळजी स्पष्टपणे दिसून येते . सातारा विकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी अश्या सुविधा सातारकर नागरीकांना मिळु लागल्या . तसेच सोनगाव येथील स्वतःच्या खाजगी मालकीची जागा , सातारचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज यांनी सातारा नगरपरिषदेस विनामुल्च दिली आहे . सातारा शहरालगत वेगवेगळ्या उपनगरामधील ग्रामपंचायतींचा रोज गोळा केला जाणार कचरा , नगरपरिषदेच्या सोनगांव येथील कचरा डेपोवर टाकला जात आहे . त्यास सातारा विकास आघाडीने काही अटकाव केलेला नाही . ज्यांनी अटकाव केला ते आता घरी बसले आहेत . शहरालगत असणा – या त्रिशंकू भागाच्या विकासाकरीता , श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नेतत्वाखाली आंदोलन करुन , जिल्हापरिषदेकडून विशेष निधीची दरवर्षी कायमस्वरुपीची तरतुद करुन घेण्यात आली आहे . त्रिशकू माग किंवा शहरालगतचा उपनगरीय भाग यांना कधीही सापत्नपणाची वागणुक सातारा विकास आघाडीकडून देण्यात आलेली नाही . याउलट त्याभागात वेळोवेळी आरोग्य , दिवाबत्ती , अश्या सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत . सध्या कोविड-१ ९ या संसर्गजन्य रोगाने जगामध्ये थैमान घातले असताना , खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या सूचनांनुसार सातारा नगरपरिषेच्या पदाधिकारी – नगरसेवक आणि कर्मचा – यांनी विशेष करून आरोग्य कर्मचारी यांनी जीवाची बाजी लावून , शहर स्वच्छता मोहिम अहोरात्र राबविली आहे . श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतत्वाखाली अद्यावतीकरण करुन सुरु करण्यात आलेले कस्तुरबा हॉस्पिटल आणि ” छ.दादामहाराज रुग्णालय , गोडोली , यांचेकडील असणा – या मेडिकल ऑफिसर व स्टाफ द्वारे घरोघरी जावून , काम च्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण , औषधोपचार जरूरीप्रमाणे मोफत करण्यात येत आहेत.आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे , कोरानाने बाधित झालेल्या मयत व्यक्तीवर कोणीही पुढे येत नसताना , नगरपरिषदेच्या माध्यमातुन अंतिम संस्कार करण्यात येत आहेत . अनेक ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था नगरपरिषदेच्या स्तरावरुन करण्यात आली आहे.
ज्या ठिकाणी शासकीय क्वारंटाईन सेन्टर्स आहेत त्या ठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारी सेवा बजावत आहेत . शहर हददीतील सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याबरोबरच, शहराला लागुन असणारी उपनगरे तसेच हद्दीबाहेरील अनेक ठिकाणी मानवतेच्या भावनेतुन जी लागेल ती सेवा नगरपरिषदेच्या माध्यमातुन दिली आहे . केवळ सातारकर नागरीकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित रहावे म्हणूनच या सर्व उपाययोजना युध्दपातळीवर राबविल्या गेल्या आहेत . त्यामुळे सातारकरांच्या भावना ऐकून या पुणे महानगरपालिकेच्या बायोमेडिकल वेस्ट जे आणले गेले आहे. त्याची सखोल चौकशी केली जावून सातारा जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका प्रशासन यांनी व पुण्याचे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तात्काळ खुलासेवजा स्पष्टीकरण , करावे व संबंधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सातारकर नागरीकांच्या वतीने सातारा विकास आघडीने केली आहे असेही किशोर शिंदे यांनी शेवटी नमुद केले आहे .
किशोर शिंदे, उपनगराध्यक्ष, सातारा नगरपरिषद, सातारा.