
स्थैर्य, फलटण : फलटण, बारामती, इंदापूर व माळशिरस या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आता जास्त प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. प्रशासकीय नियमांचे पालन होत असतानाच नुकताच उपळवे व आसूमध्ये एक नव्याने रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध्य दारू विक्री व हातभट्टी विक्रेत्यांचा व्यवसाय जोमात चालला असून अवैध्य दारू विक्री करणार्यांना रोखणार कोण? असा संतप्त सवाल सध्या तालुक्यातील नागरिक दबक्या आवाजात उपस्थित करीत आहेत.
फलटण तालुक्याच्या सीमेवर अवैध्य दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्यामुळे अवैध्य दारू विक्री करणाऱ्यांच्या मोर्चा आता तालुक्याच्या हद्दी शेजारील गावात वळला आहे. फलटण तालुक्याशेजारील तालुके म्हणजेच बारामती व माळशिरस या तालुक्यातील दारूडे आता आड मार्गाने फलटण तालुक्यात येऊन फलटण तालुक्यातून सर्रासपणे दारू घेऊन किंवा पिऊन पुन्हा आपल्या तालुक्यात जात आहेत. आगामी काळामध्ये ह्यांच्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.