पिचकारीफ बहाद्दरांना आवरणार कोण?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. 28 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद प्रशासनाने यापूर्वीच केलेली आहे. मात्र अजूनही बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकणारे पिचकारीफ बहाद्दर सहजतेने दिसून येत आहेत. कोरोनाफ नावाचा राक्षस आपल्या मानगुटीवरुन अजून किंचीतही खाली उतरलेला नसताना; बिनदिक्कतपणे सगळीकडे आपल्या थुंकीचे फवारे उडविणारे पिचकारीफ बहाद्दर एकप्रकारे कोरोनाला पाठबळ देण्याचेच काम करत आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये या दृष्टीने प्रशासन आणि आरोग्य खाते प्रयत्नशील आहे. विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने विविध सूचना केल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई घालण्यात आली आहे. सातारा जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय जागा व सर्व खाजगी जागा जेथे सामान्य माणसांचा वावर आहे अशा कोणत्याही ठिकाणी थूंकणेस मनाई करणेत आलेली आहे आणि कोणीही व्यक्ती थुंकल्यास त्यास 1000/- रु दंड आकारण्यात येईल व हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल त्यांचेकडे जमा करावा लागेल किंवा हा दंड त्या स्थानिक स्वराज्य संस्थेस वसूल करावा लागेल, असा आदेश जिल्हाधिकार्यांनी सुमारे 1 महिन्यापूर्वी जारी केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी, नागरिकांना सार्वजनिक शिस्त लागण्यासाठी ही दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे; मात्र याची ना कुणाला भिती, ना कुणाला चिंताफ असे चित्र दिसत आहे.

पान, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणार्यांची संख्या आणि बेफीकीरी दिवसेंदिवस वाढतच आहे. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, शासकीय, खाजगी कंपन्यांची कार्यालये, बँका, रस्ते, फुटपाथ अशा गर्दीच्या ठिकाणी पिचकारीफ बहाद्दरांची रंगरंगोटी सर्रास दिसून येते. चौकाचौकात दिवस – रात्र ठिय्या मांडून बसणारे ज्या ठिकाणी बसतात तिथेच कडेला वाकून कोपर्यात थुंकत असतात. वाहन चालवताना दुचाकीस्वार, चारचाकीस्वारही चालु गाडीवरुन कधी पिचकारी मारतील याचा नेम नसतो. आपली ही कृती सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने किती धोकादायक आहे याचे किंचीतही गांभीर्य यांच्याकडे नसते.

सगळ्यात धक्कादायक आणि बेफीकीरीचा प्रकार सध्या पहायला मिळतो आहे. कोरोनाफ च्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर सर्वांना बंधनकारक करण्यात आलेला आहे. याचे पालन नागरिक करताना दिसत आहेत. मात्र, व्यसनाला आवर घालणे काहींना अजिबात जमत नाही हे दुर्दैव आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना तोंडात तंबाखुजन्य पदार्थाचा तोबरा आणि तोंडावर मास्क; आणि थुंकताना हे बहाद्दर आपला मास्क तोंडावरुन किंचीत खाली घेतात आणि तोंडातून पिचकारी फवारुन मोकळे होतात. हा किळसवाणा प्रकार संताप आणल्याशिवाय राहत नाही. पण अशा बेफिकीरांना याबाबत जर टोकले तर ङ्गबाकीचे थुंकतातच की, एवढ्याशा थुंकीने काय होणारे?फ असा उलट सवाल करतात आणि निघून जातात. भांडणाचे प्रसंग नको म्हणून अशा माणसांविरुद्ध स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली जात नाही. त्यामुळे कायदेशीर तरतूद असूनही शिक्षा म्हणून आर्थिक दंडाचा फटका यांना बसतच नाही. असे एक ना हजारो लोक शहरात, तालुक्यात सर्वत्र थुंकत खुशाल वावरत आहेत.

रस्त्यावर पान – तंबाखू खाऊन थुंकू नये, शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नये यासाठी यापूर्वी शासनाने अनेकदा नियम, कायदे, दंड घोषित केले. मात्र वर्षोन्वर्षे ही समस्या कमी न होता वाढतच आहे. बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, मिसरी या सारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तंबाखू आरोग्याला घातक आहे. तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे माहीत असूनही अनेक तरुण आज या व्यसनांच्या आहारी गेले आहेत. यातील धोके माहित असूनही सेवन करणार्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे.

खरं तर संपूर्ण जगाच्या सार्वजनिक आरोग्याची स्थिती पुरती ढासळलेली आहे. इथून पुढच्या काळात सर्वांनीच अत्यंत जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. ङ्गकोरोनाफसारख्या विषाणूजन्य रोगाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. त्यामुळे अशा ङ्गपिचकारीफ बहाद्दरांनी थोडीतरी स्वत:ची सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून असे घाणेरडे प्रकार टाळण्यासाठी इथूनपुढे तरी स्वयंशिस्त अंगिकारणे आवश्यक आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही स्वयंशिस्त या ङ्गपिचकारीफ बहाद्दरांमध्ये कशी आणि कधी निर्माण होईल? आणि यांच्या व्यसनांचा त्रास सर्वसामान्यांनी किती दिवस भोगायचा? हा खरा गंभीर प्रश्न आहे.

शेवटचा मुद्दा : औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद औद्योगिक वसाहतीपासून नजिक पाटोदा हे गाव आहे. या गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील ग्रामविकासाच्या त्यांच्या अनोख्या शैलीने प्रसिद्ध आहेत. ङ्गयेथे थुंकू नकाफ अशी सूचना असली तरी लोक त्या ठिकाणी थुंकतात; यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी गावात ठिकठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत वॉशबेसिन बसवून अशा पिचकारी बहाद्दरांची एकप्रकारे थुंकण्याची सोय करुन दिली आहे. लोकांना सरळ सांगून कळत नाही त्यामुळे गावात अशी अनोखी शक्कल लढवून त्यांनी गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवले आहे. त्यामुळे कायद्याला न जुमानणार्या पिचकारीफ बहाद्दरांच्या सोयीसाठी आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या गावात, शहरात स्वच्छता राखण्यासाठी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या अनोख्या पाटोदाफ पॅटर्नचा अभ्यास करुन त्याचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरेल.

– रोहित वाकडे,

संपादक, सा.लोकजागर, फलटण.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!