सोन्याच्या दरात सुधारणा तर आशावादी संकेतांमुळे तेलाचे दर वाढीच्या दिशेने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०४: अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात घट झाल्याने सोन्याचे दर वाढले तर जागतिक मागणीत भरपूर सुधारणेच्या संकेतांमुळे तेलाच्या दरांनाही आधार मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: कालच्या व्यापारी सत्रात अमेरिकी ट्रेझरीने घट दर्शवल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.४ टक्क्यांनी वाढले आणि ते १९०७.९ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. मागील काही व्यापारी सत्रांपासून अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न सोन्याच्या विरोधात परिणाम दर्शवत आहे. अमेरिकी डॉलरचे मूल्य दर्शवणाऱ्या डॉलर इंडेक्समध्ये वृद्धी दिसून आल्याने इतर चलन धारकांसाठी सोने फार आकर्षक ठरले नाही. त्यामुळेही सोन्याच्या दरांवर मर्यादा आल्या. तसेच, जागतिक अर्थव्यवस्थांमधील गेल्या काही काळातील सुधारणा आणि वाढत्या तेलाच्या दरांमुळे गुंतवणूकदार जोखिमीच्या मालमत्तांकडे वळाले. तथापि, संभाव्य महागाईच्या चिंतेने मागणी असल्याने सोन्याचे दर फार कमी झाले नाहीत.

कच्चे तेल: कालच्या व्यापारी सत्रात डब्ल्यूटीआय क्रूडचे (कच्चे तेल) दर १.६ टक्क्यांनी वाढले आणि ते ६८.८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. मागणी वाढल्याने तसेच इराण आण्विक चर्चेला गती मिळत असल्याने बाजारातील भावनांना आधार मिळाला. ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक आणि सदस्यांनी तेल-मागणीतील वृद्धीच्या अंदाजानंतर, आधीच्या नियोजनानुसार उत्पादन कपात कमी करण्याचे ठरवले.

ओपेक समूह आणि रशियाच्या नेतृत्वातील सदस्य जूनमध्ये ७००,००० बॅरल प्रतिदिन तर जुलैमध्ये ८४०,००० बॉरल प्रतिदिन असे उत्पादन वाढवतील. तसेच ओपेकने एप्रिल २०२२ पर्यंत ५.८ दशलक्ष बॅरल उत्पन्न अतिरिक्त करण्याचे नियोजन केले आङे. तेल उत्पादक देशांच्या समूहाची पुढील बैठक १ जुलै २०२१ रोजी होईल. व्हिएन्ना येथे झालेल्या वाटाघाटीच्या पाचव्या फेरीनंतरही कोणताही मोठा परिणाम न झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत इराणी तेल परतण्याची शक्यता धुसर झाली.


Back to top button
Don`t copy text!