
स्थैर्य, सातारा : सातारा शहरातील प्रमुख मध्यवर्ती बस स्थानकात दररोज महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाच्या हजारहून अधिक बसेस यायचा करतात. मात्र या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारातच पडलेले हे भले मोठे खड्डे प्रवाशांना आणि एसटी चालकांना मोठे संकटच वाटतात. त्यामुळे ही दुरुस्ती लवकरात लवकर करून प्रवाशांच्या सेवेत बस स्थानक सुसज्ज बनवावे, अशीच अपेक्षा प्रत्येक प्रवासी करत आहेत . (छाया – अतुल देशपांडे, सातारा)

