
सातारा – येथील जिल्हा कारागृह आणि सातारा पोलीस ठाण्याच्या आवारात अगदी भर रस्त्यातच अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने तसेच दंडात्मक कारवाई केलेली ही धूळ खात पडलेली वाहने मुख्य रस्त्याच्या परिसरातच अशी ठेवण्यात आली आहेत. या वाहनांमुळे परिसराला अक्षरशः एखाद्या अडगळीचे रूप प्राप्त झाले आहे. ही वाहनांची अडगळ पोलीस खात्याने हटवावीत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याबाबत लवकरच कार्यवाही दिसून येईल अशी अपेक्षा सामान्य सातारकर व्यक्त करीत आहेत. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)

