२०१९ च्या वचननाम्यात मराठी भाषेसंदर्भात दिलेली वचने कधी पूर्ण करणार – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करण्याचे वचन मराठी राजभाषा  दिनाचे औचित्‍य साधून मुख्यमंत्री पूर्ण करणार का असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. भांडारी यांनी सांगितले की,  २०१९ च्‍या विधानसभा  निवडणुकीवेळी शिवसेनेतर्फे प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्या वचननाम्‍यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करण्याबरोबरच  मराठीचे पुरातन दस्‍तावेज, ऐतिहासिक व सांस्‍कृतीक महत्‍व जाणून घेवून देश विदेशातील विविध भाषांमध्‍ये देवाण-घेवाण करण्‍यासाठी जागतीक मराठी विद्यापीठ निर्माण करणार, या खेरीज मराठी भाषेची गोडी युवकांमध्‍ये निर्माण व्‍हावी म्‍हणून १० वी व १२ वी मधील मराठी भाषा परिक्षेत ८० टक्‍क्‍याहून अधिक गुण प्राप्‍त करणा-या विद्यार्थ्‍यांना विशेष शिष्‍यवृत्‍तीने सन्‍मानित करण्‍याची वचने सुध्‍दा शिवसेनेच्या वचननाम्‍यात देण्‍यात आली होती. मात्र या वचनांची पूर्तता झालेली नाही असे श्री. भांडारी यांनी निदर्शनास आणून दिले.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्‍य साधून वरील वचने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने निर्णय जाहीर करावा आणि माय मराठीचा यथोचित सन्‍मान करावा, अशी भाजपाची मागणी असल्याचे श्री. भांडारी यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!