दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । सातारा । वय वाढले तरी आमची बुध्दी लहान मुलापेक्षा कमी असे म्हणणाऱ्या खासदारांच्या बुध्दीच्या अचाट लीला आहेत . लोकांमधून लोकसभेत निवडून खासदार राजीनामा देऊन मागच्या दाराने राज्यसभेत खासदार मग यांच्या बुध्दीला काय म्हणावे ? असा उपरोधिक प्रति टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगाविला .
कास येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची बुध्दी लहान मुलांपेक्षा कमी असल्याची टीका केली होती . या टीकेचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी सुरूची निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन जोरदार समाचार घेतला .
शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले की, खासदार म्हणतात मी घरफोड्या केल्या पण मी कोणाचे घर फोडले हे खासदारांनी सांगावे, माझ्यावर घरफोडीचा कोठेही गुन्हा दाखल नाही . दर पंचवार्षिकला चार महिने आधी नारळ फोडायचे उद्घाटने करायची ? आणि अजिंक्य उद्योगासंदर्भात ठरलेली कॅसेट वाजवायची . खासदारांनी अजिंक्यतारा बँकेची माहिती घेऊन मगच बोलावे . अजिंक्यतारा बँक रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार सक्षम बँकेत विलिन करण्यात आली आहे . त्यामुळे कोणत्याही ठेवीदारांचे पैसे बुडाले नाही . मग मी कोणाचे घर फोडले याचे उत्तर खासदारांनी द्यावे असा सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी केला .माझी बुद्धी छोटी च राहिली आहे वाढ झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे खासदार यांची बुद्धी मोठं आहे याचं आविष्कार सर्वाना माहीत आहे .मी फक्त म्हटले की निवडणुका आल्या की नारळ फोडायच पण पालिकेस लुटायचे एवढंच यांचे काम आहे
आपल्या अफाट बुद्धीतून भुयारी गटर योजना का पूर्ण झाली नाही .बायोमायनिंग चे पैसे कुठे गेले एकूणच प्रत्येकातून पैसे काढणे हाच पराक्रम दिसत आहे स्थायी चे सभेत 400 विषय निवडणूकीच्या तोंडावर घेणं म्हणजे केवेळ पालिकेस लुटण्याचाच प्रकार आहे . या गैरप्रकारांना नगर विकास आघाडीने वेळोवेळी विरोध केला .हा विरोध करताना आपण कुठेही कमी पडलो नाही . आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा यांनी सुध्दा इर्षेतून भाजपमध्ये येण्याची हौस पूर्ण केली . पुढच्या दाराने लोकसभेला लोकांमधून निवडून गेलेले उदयनराजे राजीनामा देऊन मागच्या दाराने राज्यसभेचे खासदार झाले , तेव्हा यांच्या मोठया व उंची असणाऱ्या बुध्दीला काय म्हणावे असा टोला शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना लगाविला .
नगरपालिकेत जे झालं आहे ते आम्ही मांडूच म्हणजे यांनी काय केलं ते लोकांना ही कळू द्या. स्थायी च्या सभेत 400 विषय होते यामध्ये विरोध केला तर आमच्या कामांना विरोध करायचं हे अगोदर पासून पायंडा आहे. माझी बुद्धी लहान आहे तर त्यांची मोठी असेल तर त्यांनी निर्णय घ्यावेत. ज्या पद्धतीने नाविआ ने वातावरण तापवायला पाहिजे पण ते झालं नाही का ?यावर ते म्हणाले, बायोमायनिंग , पंतप्रधान योजना घरकुल यावर तक्रार ही देण्यात आल्या आहेत पण कारवाई झाली नाही घंटा गाडी आत्महत्या प्रकरण झाले पण सत्तेपुढे फारसं सत्ताधाऱ्यांनी चालून दिले नाही .
केंद्रातून येणारा निधी तर त्यांचं श्रेय मग असे असेल तर राज्य स्तरावर आमचं अस कुठं तरी सूत्र लावलं पाहिजे पण अस दिसत नाही असे सांगून शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले जिल्हा बँक निवडणुकीत दीपावली ला डबे घेऊन जाण्याची का वेळ आली जर तुमची बुद्धी।मोठी होती तर ही वेळ का आली. सर्वसामान्य महिलेला अधिकार का आता दिले नाही एवढं अस घडताना त्यांचा मान काय ठेवला आहे असा रोखठोक सवाल केला .
जावळी त शशिकांत शिंदे म्हणतात आम्ही जनतेतील राजे आहोत यावर काय सांगाल त्यावेळी।म्हणाले, आम्ही तरी कुठ आहोत आम्ही ही लोकशाहीतील राजे आहोत सातारा विधानसभा मध्ये ज्यांना कोणाला यायचे आहे त्यांनी यावे. माझ्या मतदार संघात कौल माझ्याच बाजूने राहील असा ठाम विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला .
नगरपालिका विकासकाम म्हणजे नारळ फोडण एवढंच काम आहे आता परत सत्ता कशी मिळवायची यासाठी चाललेला खटाटोप आहे. लोकांनी ठरवायचे डायलॉग बाजी च राजकारण की विकास हवा आहे ते हद्दवाढी चा विषय पूर्वी च झाला असता पण यांच्या बगलबच्चासाठी दोन वर्षे लांबवली.पालिकेची निवडणूक ही पक्ष चिन्हावर व्हावी का याबाबत काय मत आहे त्यावर ते म्हणाले आजपर्यंत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली नाही आघाडी म्हणून लढवली आहे याबाबत चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली. पक्ष आदेश आला तर त्यावेळी त्याचा विचार करू
कासचा निधी तुम्ही आणला आहे तर आता नारळ फोडायला तुम्ही जाणार का.एकदा उदघाटन झाल्यावर पुन्हा विषय येत नाही.प्रशासक आल्यानंतर कासची पाहणी करणार आहे असे ते म्हणाले .