आयुष्यात खूप म्हणजे खूप गोष्टी आहे ज्या शिकायलाच हव्यात.
शांत राहायला शिकायला हवे – खूप खूप प्रयत्न करून काही गोष्टी ठीक नाही. झाल्या पण जेव्हा थोडा वेळ शांत राहिले तेव्हा आपले आपणच मार्ग सापडत गेले. कदाचित म्हणूनच असे म्हणतात कि, शांतता आणि संयम अभूतपूर्व आयुष्याचा पाया आहे.
हसतमुख राहायला शिका – सर्व परिस्थिती मध्ये चेहऱ्यावरची हास्य नावाची जी लकीर असते ती ढळता कामा नये. हसतमुख राहायला शिका थोडक्यात स्माईल मस्ट आहे. हसऱ्या चेहऱ्याचा विसर सहसा लवकर कोणाला होत नाही.
रडायला शिका – रडून मन हलके करा रडल्याने सर्व दुख संपत नाही पण मन हलके जरूर होते.
व्यक्त व्हायला शिका – व्यक्त होणे म्हणजे बोलणेच असे नाही व्यक्त म्हणजे तुमचे आवडी छंद जोपासा आणि त्यातून स्वतः ला व्यक्त करा.
स्वतःला सतत बिझी करायला शिका कारण, रिकामे डोके हे सैतानाचे सर्वांसोबत एकदम छान हसतमुख राहायला शिका. अनोळखी लोकांसोबत सुद्धा कारण, कधी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन खूप मोठा बदल करेल हे सांगता येत नाही.
चूक असेल तर माफी मागा आणि त्याचबरोबर माफ ही करायला शिका. माणूस आहे चुका तर होणारच न… आणि माणूसच तर आहे माफ करायला असे कित्ती पैसे लागतील …. आणि शेवटच आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या बाबतीत नवीन आणि पूर्णपणे वेगळा असतोच त्याला तितक्याच आनंदाने जगायला शिका. प्रत्येक वेळी समस्या वेगळी असते कदाचित अगोदरच्या पेक्षा मोठी असते परंतु प्रत्येक समस्या ही त्यावरचा उपाय घेऊनच येत असते, असे ऐकले आहे.