स्थैर्य, फलटण, दि. १६ जून २०२१ : फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निर्देशित केलेले पत्र फलटण तालुक्यामध्ये सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल झाले. या नंतर बहुतांश नागरिक व व्यापाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. नक्की फलटण तालुक्यामध्ये कोणत्या अस्थापना व दुकाने सुरु राहणार आहेत. त्यांच्यासाठी कोणते नियम असणार आहेत. असे अनेक प्रश्न सध्या फलटण तालुक्यातील नागरिकांच्या मनात उपस्थित झालेले आहेत. त्यासाठी दैनिक स्थैर्यने फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याशी संपर्क साधला. व काय सुरु ?, काय बंद ? याचा आढावा घेतला.
फलटण तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यांनी आदेश पारित करून सुद्धा फलटण शहरामधील बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व अस्थापना ह्या सुरु केलेल्या होत्या. त्या मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अंशतः लोकडाऊनचे पारित केलेले आदेश लागू राहणार आहेत, अशी माहिती या वेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.
- फलटण तालुक्यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या अस्थापना व दुकाने हि सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
- अत्यावश्यक सेवेमध्ये नसणारी सर्व दुकाने व अस्थापना ह्या पूर्णतः बंद राहतील.
- हॉटेल, रेस्टोरंट यांना घरपोच व पार्सल सुविधेसाठी परवानगी असेल.
- सोमवार ते शुक्रवार सार्वजनिक जागा, खुल्या मैदानामध्ये चालणे, सायकल चालवणे इत्यादी साठी सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत परवानगी असेल.
- अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी २० जणांनाच उपस्थितीसाठी परवानगी असेल.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिटिंग साठी ५० % क्षमतेने घेण्याची परवानगी असेल.
- व्यायामशाळा, केशकर्तनालय येथे फक्त लसीकरण झालेल्या ग्राहकांसाठी पूर्व वेळ राखीव करून विनावातानकुलीत साठी परवानगी असेल.
अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल
- रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे , वाहतूक व पुरवठा साखळीस लस , सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण
- व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स
- वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज
- किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटण, चिकन, अंडी, मासे दुकाने इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थाची दुकाने
- कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा
- सार्वजनिक वाहतूक – विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस
- राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम (सातारा जिल्हयाचे पश्चिम भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे)
- स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा
- भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा
- सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉरिशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत
- दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती / देखभालीसाठी आवश्यक सेवा
- माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा
- शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याशी संबंधित संलग्न उपक्रम
- सर्व वस्तूंची निर्यात – आयात
- ई – कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी)
- अधिकृत मीडिया
- पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
- गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस / आयटी सेवा
- सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा
- विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा
- ATMs, पोस्टल सेवा
- कस्टम हाऊस एजंट्स / परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर / जीवनरक्षक औषधे / फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत.
- कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक
- व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा
- मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने
- सातारा जिल्हयातील सर्व बाजार समित्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल. कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी ज्या त्या स्थानिक नागरी / ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल
- स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा