तुमच्या गाडीला कोणती नंबरप्लेट? जाणुन घ्या नंबरप्लेटची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । फलटण । सध्या रस्त्यावर विविध प्रकारची वाहने फिरताना आढळतात. प्रत्येक वाहनांवर विशिष्ट प्रकारची नंबरप्लेट आढळते आज आपण याविषयी माहिती जाणून घेउया.

पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेटवर काळ्या रंगाने नंबर लिहीलेला असल्यास अशा प्रकारची नंबरप्लेट असणारे वाहन हे कमर्शियल वाहन म्हणून ओळखले जाते. अशी नंबरप्लेट ही बहुतांशी ट्रक किंवा टॅक्सी यावर आढळते.

लाल रंगाच्या नंबरप्लेटवर पांढर्‍या रंगाने नंबर लिहीलेला असल्यास अशा प्रकारची नंबरप्लेट असणारे वाहन हे आरटीओकडून परमनंट रजिस्ट्रेशन मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात अशी नंबरप्लेट दिली जाते. भारतीय राज्यांमध्ये अशी नंबरप्लेट असणार्‍या वाहनांना रस्त्यावर वाहन चालवण्यास परवानगी नसते.

हिरव्या रंगाच्या नंबरप्लेटवर पांढर्‍या रंगाने नंबर लिहीलेला असल्यास अशा प्रकारची नंबरप्लेट असणारी वाहने लष्करी वाहने असतात. पहिल्या किंवा दुसर्‍या कॅरेक्टरनंतर वरच्या बाजूस असणारा बाण हा बॉड अ‍ॅरो म्हणून ओळखला जातो. बाणापुढील अंक वर्ष दाखवतात. सिरीयल नंबरनंतर होणारे अक्षर हे वाहनाचा क्लास दाखवते.

निळ्या रंगाच्या नंबरप्लेटवर पांढर्‍या रंगाने नंबर लिहीलेला असल्यास अशा प्रकारची नंबरप्लेट असणारी वाहने ही परदेशी प्रतिनिधी किंवा राजदुत यांची असतात. यावर भारताऐवजी तो ज्या देशातील राजकीय प्रतिनिधी असतो त्या देशाचा कोड लिहीला जातो.

याशिवाय रस्त्यावर फिरणार्‍या दररोजच्या वापरातील गाड्यांवर पांढर्‍या रंगाच्या नंबरप्लेटवर काळ्या रंगाने नंबर लिहीलेला असतो.


Back to top button
Don`t copy text!