स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो.
अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.
स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.
अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.
अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.
भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.
कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफ्फुसाचे रोग होतात.
आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा, अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता होते.
दु:ख दाबून ठेवल्याने फुफ्फुसे स व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.
अधिरता, अतिआवेश, घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.

स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.

प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.
स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.
हासत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.
तर मग आता आपल्या रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. हासत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.

आपलाच हास्यमय ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!