शेतकर्यांसाठी गुरे केवळ पशुधन नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचे अविभाज्य घटक आहेत. ही गुरे दैनंदिन शेतीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्यायी उत्पन्नाचे साधन ठरतात आणि अन्य शेतातील कामांसाठी कच्चा मालदेखील पुरवतात. जसं आपण आपले आयुष्य, वाहन आणि आरोग्य यांना इन्श्युअर करतो, त्याप्रमाणे आपल्या गुरांनाही इन्श्युरन्स करू शकतो का? गाई, म्हशी, शेळी आणि अन्य पशुधन हे इन्श्युरन्सद्वारे ‘कव्हर’ केले जातात.
आपले पशुधन आपल्याला भरपूर लाभ देतात आणि आपल्यावर काळजीसाठी अवलंबून राहतात. गुरांसाठी इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केल्यामुळे अतिरिक्त संरक्षण मिळते आणि सर्वोत्तम निगा राखण्याची खात्री पटते. सर्वात महत्वाचं आपली उपजिविका सुरक्षित राहते. याव्यतिरिक्त, जर आपली गुरे आजारी पडली किंवा अपघात झाला तर ते आपल्याला येणार्या आर्थिक तणावापासून आपले संरक्षण करेल. ज्यामुळे शेतकर्यांना आत्मविश्वासानं शेती करणं शक्य ठरेल.
कॅटल इन्श्युरन्सअंतर्गत काय ‘कव्हर’ केले जाते, हे समजून घेऊया…
- अपघाती मृत्यू किंवा आजाराने मृत्यू :
जर तुमच्या गुरांना अनपेक्षित अपघात झाला किंवा आजार झाला आणि योग्य वैद्यकीय उपचार प्राप्त झाले असूनही रिकव्हर झाले नाही आणि मृत्यू ओढावला तर इन्श्युरन्स कंपनी तुम्हाला पॉलिसीच्या स्थितीनुसार सम इन्श्युअर्डपर्यंत रक्कम देईल. जी नवीन गुरांच्या खरेदीसाठी वापरली जाऊ शकते. - कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व :
जर तुमच्या गुरांना आजार/अपघातामुळे कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व आले असेल आणि शेतात काम करू शकत नसेल किंवा दूध घालण्याची क्षमता गमावली असेल तर तुम्हाला गुरांना झालेल्या अपंगत्वाच्या स्तरानुसार सम इन्श्युअर्डच्या निश्चित टक्केवारीसह भरपाई दिली जाईल. ही भरपाई सामान्यपणे सम इन्श्युअर्डच्या ५०% ते ७५% पर्यंत असते. - शस्त्रक्रियेमुळे मृत्यू :
जर तुमच्या गुरांवर कोणत्याही आजार किंवा अपघातासाठी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार केले असतील. शस्त्रक्रिया ही वैध पशुवैद्यकीय डॉक्टरांद्वारे करायला हवी. जर शस्त्रक्रियेच्या दरम्यान गुरांचा मृत्यू झाला तर इन्श्युरन्स कंपनी तुम्हाला पॉलिसीमध्ये नमूद आणि मान्य केल्याप्रमाणे सम इन्श्युअर्डच्या रिप्लेसमेंट किंवा सब-लिमिटची रक्कम अदा करेल. - डॉक्टरांसोबत सल्लामसलत आणि निदान चाचण्या (अॅड-ऑन कव्हर) :
कॅटल इन्श्युरन्सअंतर्गत हे कव्हरेज जेव्हा तुमचे गुरांना आजारी पडते तेव्हा पशुवैद्यकीय सल्लामसलत संबंधित खर्च कव्हर करते. यामध्ये विहित निदान चाचण्यांचा खर्च देखील समाविष्ट आहे. तुमच्या पाळीव प्राण्यांना तुमच्या आर्थिक नियोजनावर ताण न पडता वेळेवर आणि अचूक वैद्यकीय मदत मिळेल याची खात्री मिळते. अतिरिक्त प्रीमियम भरण्याद्वारे उपलब्ध होते (केअर प्लस अॅड-ऑन कव्हर अंतर्गत).
सारांशरुपात, गुरांसाठी इन्श्युरन्स संरक्षण परिपूर्ण फायनान्शियल आधार प्रदान करतो. ज्यामुळे केवळ तुमच्या फायनान्सचे संरक्षण होत नाही तर तुमच्या पशुधनाच्या परिपूर्ण रिकव्हरची खात्री होते. वैद्यकीय खर्च कव्हर करून आणि मृत्यूच्या बाबतीत गुरांच्या बदलीसाठी प्रदान करुन हा इन्श्युरन्स अनपेक्षित पशुवैद्यकीय खर्च आणि पशुधन नुकसानीमुळे आमच्या फायनान्सचे नुकसान टाळण्यास मदत करतो. आपल्या प्राणप्रिय मूक साथीदाराच्या कल्याणाची यामुळे केवळ सुनिश्चिती होत नाही तर परिपूर्ण फायनान्शियल सुरक्षा मिळते. ज्यामुळे संभाव्य आकस्मिक खर्चापासून दिलासा मिळतो आणि आर्थिक स्थिरतेला चालना मिळते.
- नोंद :
पॉलिसी कालावधीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि मनःशांती राखण्यासाठी नेहमीच तुमच्या प्रोव्हायडरकडून तुमचे इन्श्युरन्स कव्हरेज पूर्णपणे समजून घेण्याची खात्री करा.
– श्री. आशिष अग्रवाल,
हेड – अॅग्रीबिझनेस, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स