कोरोनाच्या बाबतीत काय आहे नक्की फलटण तालुक्याची स्थिती


स्थैर्य, फलटण : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली काही लक्षणं नव्याने पुढे आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. जगभरात गेल्या तीन – चार महिन्यांत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसली आहेत. कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.  मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात.  तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. तसंच यावेळी घसा लाल होऊन दुखू लागतो. म्हणूनच कोव्हिड-19 ची तपासणी करताना थ्रोट स्वॅब म्हणजेच घशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. 

फलटण तालुक्यात दिनांक ३१ जुलै, रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत फलटण तालुक्यात सद्य स्थितीत बाधित असलेले रुग्ण ७९ असून एकूण बरे झालेले रुग्ण १८९ आहेत तर फलटण तालुक्यात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झालेला आहे. तालुक्यात एकूण कोरोना बाधित २७८ रुग्ण आहेत. अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!