स्थैर्य, फलटण : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली काही लक्षणं नव्याने पुढे आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. जगभरात गेल्या तीन – चार महिन्यांत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसली आहेत. सध्या फलटण तालुक्यात काल (दिनांक ५ जुलै) अखेर १२९० व्यक्ती गृह विलीगीकरणात असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील कोरोना केअर सेंटर मध्ये DCHC विभागात १४ जण असून कन्फर्म वार्ड मध्ये 68 तर सस्पेक्ट वार्ड मध्ये ७१ जण आहेत. काल घेतलेल्या चाचण्या मध्ये ३० चाचण्या असून परवा रात्री उशिरा १७ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर एकूण ४५ जणांचे अहवाल बाकी आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.