पाच राज्यांच्या निकालाचा बीजेपीला फायदा किती आणि तोटा किती? कोणाच्या अडचणी वाढल्या ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । फलटण । नुकत्याच ५ राज्यांच्या निवडणुकींचे निकाल लागले. वरकरणी बीजेपीच्या खेम्यामध्ये आनंद असला तरी योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांच्या अडचणी वाढल्या की कमी झाल्या? हा महत्वाचा प्रश्न उभा राहतो. याचे विश्लेषण केले तर यावरून एकाच लक्षात येते की,अडचणी वाढल्या आहेत.

या निवडणुकांचे विश्लेषण केले असता हे लक्षात येईल की,बीजेपीने आपली सत्ता कायम ठेवत बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. हे यश मिळाले असले तरी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मागील विधान सभेच्या जागेच्या तुलनेत 57 जागा कमी झाल्या आहेत. याचे परिणाम काय होईल? याचे परिणाम दीर्घकाळ दिसून येतील. कारण याच वर्षी दोन तीन महिन्यात राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार आहेत.त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. समाजवादी पक्षाच्या विधान सभेच्या जागा मागील जागेपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे राज्यसभेतही त्यांच्या जागा वाढणार आहेत. त्याच प्रमाणे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमत प्राप्त करत विधान सभेच्या ९३ जागा मिळवल्याने त्यांच्याही राज्यसभेतील जागा वाढणार आहेत. पंजाबच्या जवळपास ७ जागा रिक्त होणार आहेत.याच कारणामुळे बीजेपीच्या पर्यायाने मोदी सरकारच्या राज्यसभेतील जागा या कमी होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीतून बीजेपीने काय मिळवले?कारण लोकसभेत बहुमत असले तरी राज्यसभेत ही बहुमत असणे गरजेचे आहे. कारण कोणतेही विधेयक बहुमताच्या जोरावर लोकसभेत पारित केले तरी त्याला राज्यसभेची मंजुरी असल्याशिवाय त्याचे कायद्यात रुपांतर होणार नसल्याने बीजेपीला या निवडणुकीत सत्ता मिळाली असली तरी त्यांचे नुकसानच झाले आहे.राज्यसभेत बहुमत असल्याशिवाय मोदी सरकारला कोणतेही नवीन कायदे बिले पारित करता येणे शक्य नाही. थोडक्यात या निवडणुकीने लोकशाहीच मजबूत झाली आहे. हीच भारतीय संविधानाची खासियत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा ही कार्यकाळ संपणार आहे.त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणुकी ही होणार असल्याने या निवडणूक निकालावरून बीजेपीच्या अडचणी वाढल्या आहेत.निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या मतदानाची किमंत जास्त असते. ती ७०८ एवढी असते.याचा अर्थ जर बीजेपीचे ५७ विधान सभा सदस्य कमी झाले असल्याने ४०३५६ येवढे बीजेपीचे मतदान कमी झाले आहे.हे कसे समजण्यासाठी हे लक्षात घ्या जेवढी राज्याची लोकसंख्या आहे त्याला राज्यांच्या विधान सभेच्या एकूण जागेने भागले जाते.येणाऱ्या संख्येला १ हजार ने गुणले जाते त्यातून जी संख्या येईल ते त्या राज्यातील मतदानाची किमंत ठरते.उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या जास्त असल्याने राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाची किंमत जास्त आहे.त्यामुळे उत्तर प्रदेश च्या ५७ जागा कमी झाल्याने जवळजवळ ४० हजार मतदान राष्ट्रपती निवडणुकीत कमी झाले आहे. राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी साडे पाच लाख मतदानाची आवश्यकता असते.आता बीजेपीकडे साडे चार लाखच मतदान आहे.मागील निवडणुकीत त्यांनी इतरांच्या मदतीने रामनाथ कोविंद यांना निवडून आणले होते.यावेळी मात्र त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण यावेळी ते आपल्या मर्जीतील राष्ट्रपती निवडून आणू शकणार नाहीत.राष्ट्रपती निवडणुकीसाठी जमवाजमव सुरु झाली आहे. के.चंद्रशेखर राव यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.त्यानंतर ते केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना भेटले,एम के स्टालिन यांना ही भेटले.ममता बॅनर्जी या सुध्दा हैद्राबादला जाऊन के.चंद्रशेखर राव यांना भेटल्या आहेत.त्यामुळे एक संयुक्त मोर्चाची जमवा जमव सुरु झाली आहे.दक्षिणेकडील राज्ये व महाराष्ट्र राज्य हे सर्व मिळून लोकसभेच्या २०० जागा होतात.त्यामुळे जर आपण लोकसभेचा विचार केला तर जवळ जवळ अर्ध्या जागा या राज्यांच्या होतात.त्यामुळे या सर्वांनी जर एकत्रित येऊन निर्णय घेतला तर बीजेपीला राष्ट्रपती उमेदवार निवडून आणणे अशक्य आहे. या सर्व राज्यांनी मिळून जर शरद पवारांसारखा सर्व समावेशक व राजकीय मुत्सादी उमेदवार राष्ट्रपती पदासाठी निवडला तर कॉंगेस, डावे पक्ष व इतर सर्व एकत्र येऊन उमेदवार निवडून आणू शकतात. त्यामुळे या सर्व घटना बीजेपीच्या अडचणी वाढण्याकडे निर्देश करत आहेत.

या पाच राज्याच्या निवडणुकीने बीजेपीला वेगळे काय मिळाले? उत्तर प्रदेशची सत्ता त्यांच्याकडेच होती ती कायम राखली. उलट त्यांच्या ५७ जागा कमी झाल्या. उत्तराखंडमध्ये त्यांची सत्ता पूर्वी ही होती ती कायम राखली मात्र तिथे ही जागा कमी झाल्या. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान कमी होणार आहे व राज्यसभेच्या जागा ही कमी होणार आहेत. त्यामुळे बीजेपीच्या खेम्यामध्ये आनंदोत्सव असला तर त्यांच्यासाठी मार्ग खडतर बनला आहे.त्यांची सत्तेची ताकद कमी झाली आहे. हे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या निकालाचा बीजेपीला फायदा कमी पण तोटाच झाला आहे आणि त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे.

सोमनाथ घोरपडे,सामाजिक कार्यकर्ता
मो.नं – ७३८७१४५४०७
इमेल : [email protected]


Back to top button
Don`t copy text!