दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमासाठी फलटण तालुक्यातील खामगाव येथे आलेल्या उद्यानकन्या कु. कर्वे विनया, कु. जाधव वैभवी, कु. नाळे ऋतुजा, कु. गिरी वैष्णवी, कु. खरात आकांक्षा, कु. गुंजवटे साक्षी यांचे सहर्ष स्वागत सरपंच सौ. शकुंतला रावसो वैद्य यांनी केले.
सर्व उद्यानकन्यांनी सरपंच सौ. शकुंतला वैद्य यांना भेटुन गावाविषयी माहिती मिळवली. गावातील समस्यांविषयी चर्चा केली. तसेच गावातील रब्बी फळ, भाजीपाला, फुलपीकांबद्दल माहिती मिळवली. या अडीच महिन्यांच्या कालावधीत उदयानकन्या शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड, रोग, बीज प्रक्रिया, शेतातील अवजारांचा, शेतीचे आर्थिक, जनावरांचे लसीकरण आदी बाबत गावकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यक्रम राबवणार आहेत. विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करून आधुनिक शेताविषयी जनजागृती करणार आहेत.
यावेळी सरपंच सौ. शकुंतला रावसो वैद्य, उपसरपंच हिराचंद रामचंद्र चाबुकस्वार, ग्रामसेवक डी. डी. निंबाळकर, कृषीसहाय्यक ए. वाय. शेख, तलाठी एस. आर. कुंभार व काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत उदयानकन्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. या सर्व उद्यानकन्यांना उद्यानविद्या महाविद्यालय फलटण प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वय अधिकारी प्रा. ए. डी. पाटील आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. व्ही. लेंभे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.