आज फलटणमध्ये श्री संत नामदेव महाराज यांच्या चरण पादुका रथ व भव्य सायकल यात्रेचे स्वागत; उपस्थित राहण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य | दि. 22 डिसेंबर 2023 | फलटण | श्री संत नामदेव महाराज यांची पंढरपूर ते घुमाण (पंजाब) चरण पादुका रथ सोहळा व साईकल यात्रा गत वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. ऐतिहासिक असे संपूर्ण देशातील शिंपी समाज भगिनी व बांधव आणि संत नामदेव भक्त एकत्रित करण्याचे कार्य या रथ यात्रा व साईकल यात्रेच्या माध्यमातून झाले आहे. देशात ठीक ठिकाणी उत्सफूर्तपणे स्वागत झाले आहे. आज आपल्या फलटण शहरात परतीच्या प्रवासात चरण पादुका रथ विठ्ठल मंदिर बारामती चौक येथे येणार आहे. श्रीराम मंदिर येथून सवाद्य मिरवणूक व विठ्ठल मंदिर बारामती चौक येथे सायंकाळी 7 वाजता पाद्य पूजा व आरती असून या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे; असे आवाहन पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!