श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यांच्या चोपदारांचे फलटण येथे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । फलटण । श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार यांचे पायी वारी दरम्यान काल दि.10 रोजी फलटण शहरात आगमन झाले असता त्यांचे येथील शासकीय विश्रामगृह येथे फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.निता नेवसे यांनी स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही श्री संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी एस.टी. ने थेट पंढरपूरला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार तसेच ह.भ.प. नरहरी महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी पालखीच्या प्रत्येक मुक्कामी एक किलोमीटर पायी वारी करुन पालखी सोहळ्याची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार काल दि.10 रोजी त्यांचे फलटणमध्ये आगमन झाले होते. त्यांचे आगमन म्हणजे प्रत्यक्ष माऊलींचे आगमन समजून प्रथेप्रमाणे फलटणच्या नगराध्यक्षा सौ.निताताई नेवसे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.

यावेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट पंढरपूरच्या सदस्या माधवीताई निगडे, माजी नगरसेवक मिलिंद नेवसे, सुरज नेवसे, विराज खराडे, सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख, ताजुद्दीन बागवान, युवराज शिंदे, मितेश खराडे, जीवन केंजळे, नसीर शिकलगार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राजाभाऊ चोपदार यांनी प्रसादाचे वाटप केले.

प्रथेप्रमाणे सोमवार दि. 12 रोजी फलटणमध्ये पालखी सोहळ्याच्या आगमनाचा दिवस येत असून कोरोनामुळे पायी सोहळा नसल्याने प्रतिकात्मक माऊलीची समाजआरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करणार असल्याचे यावेळी विराज खराडे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!