अक्कलकोटच्या निवासी शाळेत मुलांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तकाने स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सोलापूर । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अक्कलकोट येथील म्हाडा कॉलनी येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. बुधवारी (दि.15) शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे पुष्प, स्टेशनरी साहित्य, पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

गटशिक्षण अधिकारी श्रीमती शेख यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अभ्यासक्रमाबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सूत्रसंचालन एस. व्ही पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका श्रीमती एम. आर. करजगीकर यांनी मानले. यावेळी श्रीमती वासुतकर ए. जे., मुत्तगी बी. जे., सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सद्यस्थितीला शाळेत इ. 6 वी ते 10 वी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या 2022-23 वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 80टक्के जागा, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5टक्के, विशेष मागास प्रवेग 3टक्के तर अपंग प्रवर्गासाठी 2टक्के जागा राखीव आहेत. रिक्त संख्येनुसार प्रवेश देण्यात येईल. या शाळेमध्ये मोफत प्रवेश, भोजन, निवास, डिजीटल क्लासरूमची वायफायसह उच्च प्रतीची सोय, गणवेश, शालेय साहित्य, क्रिडा साहित्य, अनुभवी शिक्षक वृंद इत्यादी शासकीय नियमानुसार मिळणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 9403927518 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती करजगीकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!