निरावागज मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२३ । बारामती ।

निरावागज येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शाळेच्या पहिल्या दिवसाच स्वागत करण्यात आले.

निरावागज येथील प्राथमिक शाळा , खंडोबा आळी, पन्हाळे वस्ती, डोंबाळे वस्ती ,गाडे, धायगुडे वस्ती, देवकाते वस्ती ,येथे संत रोहिदास प्रतिष्ठान व अखिल रविदास सेवा संघ यांच्या वतीने स्व दत्तात्रेय भोसले गुरुजी मा संचालक दि माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्या स्मृती प्रित्यर्थ माळेगाव कारखाना संचालक पंकज भोसले यांच्या वतीने निरावागज येथील प्राथमिक शाळेतील ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

अशा पद्धतीचं शैक्षणिक साहित्य देण्याचे मोठं काम जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रथमताच मिळाल्याने गावकऱ्या बरोबर पालक विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले यावेळी रोहिदास प्रतिष्ठान व अखिल रविदास सेवा संघ चे पदाधिकारी व निरावागज ग्रामपंचायत सरपंच विद्या भोसले , पंचायत समिती सदस्या अबोली भोसले व ललिता ताई भोसले ,सोमनाथ भोसले ,सुनील भैया देवकाते, राहुल देवकाते, सुनील गावडे ,सुधीर देवकाते, रमेश बुरुंगले निखिल देवकाते व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते


Back to top button
Don`t copy text!