राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथे स्वागत


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । मुंबई । भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आज भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले.

याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडन्ट ले. जनरल पी. पी. मल्होत्रा (व्हीएसएम), एअर कमोडोर एच. अस्सुदानी (व्हीएम, व्हीएसएम, एओसी, नं.2 विंग, इंडियन एअरफोर्स स्टेशन पुणे) यांनी त्यांचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!