दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त व फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील उद्यानदूत ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड २०२४/२५ कार्यक्रमाअंतर्गत उद्यानदूतांचे नाईकबोमवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासक अधिकारी, सरपंच जयश्री पवार, ग्रामपंचायत सदस्य व नाईकबोमवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
नाईकबोमवाडी येथे पुढील दहा आठवड्यांमध्ये राबवण्यात येणार्या शेतीविषयक प्रात्यक्षिक, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, रक्तदान शिबिर, शेतकरी शास्त्रज्ञ चर्चा, मृदा दिन, इ. कार्यक्रमांविषयी उद्यानदूत यांच्याकडून माहिती देण्यात येईल. तसेच शेतकर्यांचे अनुभव, त्यांच्या शेती पद्धतीचा सखोल अभ्यास उद्यानदूत करणार आहेत.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. आर. पाटील, डॉ. जे. व्ही. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानदूत पवार प्रतिक, कोरडे रोहन, माने प्रथमेश, साबळे प्रथमेश, दारफले प्रज्ज्वल हा कार्यक्रम राबवणार आहेत.