पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजेंकडून स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। सातारा । महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली सातार्‍यात झाली. शासकीय विश्रामगृहावर या समितीचे जिल्ह्याच्यावतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न पत्रकार मांडत असतात. पण पत्रकारांचेही स्वतःचे त्यांच्या विस्तीर्ण समूहाचे प्रश्न असतात. भविष्यात केंद्र व राज्य स्तरावर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली कायम साथ असेल, असे यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्याकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समितीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. समितीने खासदार उदयनराजे भोसले यांना या स्वागताबद्दल धन्यवाद दिले.

यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे, समिती सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, अमन सय्यद, पुणे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.
सातारा येथे झालेल्या या बैठकीत पुणे, सोलापूर, व सातारा या जिल्ह्यातील पत्रकारांच्या अधिस्वीकृतिपत्रिकांच्या नूतनीकरण व पडताळणी बाबतचे कामकाज पार पडले.


Back to top button
Don`t copy text!