
स्थैर्य, फलटण : फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील आजच्या साप्ताहिक कांदा बाजारात कांद्याची आवक घटली मात्र दर स्थिर राहिल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. दर मंगळवारी येथील बाजार समितीच्या आवारात साप्ताहिक कांदा मार्केट भरते, आजच्या मार्केट मध्ये ३३२५ कांदा पिशवी (१६६२ क्विंटल) आवक झाली. गत सप्ताहात ६ हजार कांदा पिशवी आवक झाली होती. दर प्रति क्विंटल २०० ते ९०० रुपये, सरासरी ६०० रुपये पर्यंत निघाल्याचे बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.