
स्थैर्य, फडतरवाडी, दि. 2 ऑक्टोबर : येथील गावात दर मंगळवारी आठवडे बाजार भरण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे आता ग्रामस्थांना गावातच आवश्यक वस्तूंची खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
यापुढे प्रत्येक मंगळवारी हा बाजार नियमितपणे भरणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी या बाजारात उपस्थित राहून खरेदी करावी, जेणेकरून विक्रेत्यांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि ते दर आठवड्याला गावात येतील, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामस्थांचा सहभाग या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.