स्थैर्य, फलटण, दि.२३: फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण, स्थापत्य आभियांञिकी विभाग, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडियायांच्या सौजन्याने महाविद्यालयामध्ये दि.18 व 19 जून 2021 रोजी कंत्राटदाराचे निविदा प्रक्रिया संदर्भामध्ये प्रा.डॉ.माधव कुमठेकर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदरच्या ऑनलाइन कार्यक्रमास सातारा व इतर जिल्ह्यातील पाचशे लोकांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी प्रा. माधव कुमठेकर यांनी निविदा प्रक्रिया संदर्भात निविदाचे स्वरूप, निविदा कशी भरावी, निविदा चे प्रकार, निविदा करताना येणार्या अडचणी कशा सोडवाव्यात यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
कंत्राटदार यांना खाजगी व सरकारी निविदा प्रक्रियांमध्ये येणार्या समस्या भेडसावत असतात किंवा या स्थापत्य विभागांमध्ये नव्याने येणार्या कंत्राटदारांना योग्य प्रकारची माहिती मिळावी ही गरज ओळखून महाविद्यालयाने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मिलिंद नातू यांनी सांगितले.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय स्थापत्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा. धनश्री भोईटे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा.चंद्रकांत गोरड आणि प्रा. मुकुंद गायकवाड यांनी केले. तांत्रिक विभागाची धुरा प्रा. कुणाल चव्हाण यांनी सांभाळली. आभार प्रदर्शन प्रा. अमित सोडमिसे व प्रा. निलम इंगळे यांनी केले.