वीर धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया महिन्याभरात सुरू करू; पूनर्वसन उपजिल्हाधिकारी सौ.किर्ति नलावडे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । सातारा । दि. 15 सप्टेंबर रोजी पुर्नवसन उपजिल्हाधिकारी सौ. किर्ती नलावडे यांच्या कार्यालयात वीर धरणग्रस्त पुर्नवसन संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांच्याबरोबर झालेल्या मिटिंगमध्ये धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करत हे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारी संकलन सुची पुणे येथील पुर्नवसन विभागाकडे असल्याकारणाने त्या कार्यालयाकडुन मागितली जाईल व ती प्राप्त होताच धरणग्रस्तांची प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समितीचे समन्वयक डॉ विजय शिंदे यांनी दिली.

यावेळी वेगवेगळ्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने धरणग्रस्तांना घरबांधणीसाठी दिलेले भुखंड, गावठान नकाशा, निर्वाह भत्ता, त्याचप्रमाणे पर्यायी जमिन खंडाळा तालुक्यात देणे या व अश्या वेगवेगळ्या मागण्याबाबत चर्चा झाली. या मिटिंगसाठी निरा उजवा कालवा प्रकल्पाचे अधिकारी विजय नलावडे धरणामधील जलाशयाची पाणी पातळी वेळोवेळी निश्चितीविषयी वरीष्ठ आधिकारी यांना अवगत करु व निर्णय घेतला जाईल असे सांगितले. या चर्चेत कार्यालयाच्यावतीने तहसिलदार विवेक जाधव, समितीचे वतीने समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, जयवंत चव्हाण, गणेश जाधव, विश्वास चव्हाण, विजय चव्हाण, विशाल गायकवाड, मधुकर कदम यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!