
स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेनेच्या उमेदवार सौ. सुमन रमेश पवार यांनी मतदारांना एक महत्त्वाकांक्षी आश्वासन दिले आहे. त्या मतदारांना आवाहन करत आहेत की, आपल्याला प्रभाग क्रमांक १ ला त्याच्या क्रमांकाप्रमाणेच सर्व बाबतीत ‘एक नंबर’ करायचा आहे. हाच त्यांचा प्रमुख अजेंडा आहे.
त्यांनी सांगितले की, प्रभागातील नागरिकांचे रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था आणि पाण्याची सुविधा अशा सगळ्याच मूलभूत प्रश्नांचा कायमस्वरूपी निपटारा करण्याची त्यांची योजना आहे. या कामांसाठी मतदारांनी आपल्याला साथ द्यावी, अशी विनंती त्या करत आहेत.
सौ. सुमन पवार यांनी प्रभागातील मतदारांशी रोजचा जनसंपर्क कायम ठेवला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आणि विकासाच्या आश्वासनांमुळे मतदारांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या बाजूने सध्या सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
यासोबतच त्यांनी मतदारांना राजे गटाच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन केले. “श्रीमंत रामराजे यांच्यावर विश्वास ठेवून आजवर आपण राजे गटाला साथ दिली आहे, तशीच साथ इथून पुढेही द्या,” असे त्या सांगत आहेत. रामराजेंच्या नेतृत्वाखालील विकास पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार आहे.

