आगामी काळात या ५ टॉप इलेक्ट्रिक वाहनांवर राहील नजर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २९ : मागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगातील परिवर्तनाने प्रचंड वेग धारण केला आहे. २०१७ ते २०१८ मध्ये जागतिक ईव्ही विक्री नाट्यमयरित्या ६५% नी वाढली. या काळात २.१ दशलक्ष वाहने तयार झाली. २०१९ मध्ये ही वाढ सुरूच राहिली. कोरोना विषाणूचा नव्याने झालेल्या उद्रेकामुळे २०२० मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व २५% कमी झाली.

या अडचणीनंतरही ईव्हीची मागणी पुन्हा ब्लूमवर्ग न्यू एनर्जी फायनान्स (बीएनईएफ) नुसार वाढण्याची शक्यता आहे. यात सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (आयसीई) वाहनांनुसार किंमत अशी वैशिष्ट्ये आहेत. अहवालात आढळले की २०२५ पर्यंत जगभरातील प्रवासी वाहनांची विक्री १०% नी वाढेल. २०३० मध्ये ती २८ टक्के तर २०४० पर्यंत ५८ टक्क्यांनी वाढेल. याच अनुषंगाने जाणून घेऊयात आगामी काळात रस्त्यावर अवतरणा-या टॉप ५ इलेक्ट्रिक कारबद्दल.

एमजी सायबर्स्टर: जगातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक सुपर स्पोर्ट्स गेमिंग कॉकपीट एमजी सायबर्स्टरची लवकरच मोठ्या प्रमाणावर निर्मिती होणार आहे. एक्सटेरिअरमध्ये एमजी सायबर्स्टररने टीकाऊ एमजीबी रोडस्टर्स क्लासिक कन्हर्टेबल बॉडी स्टाइल असून सॉलीड स्पोर्ट्स कार पोश्चर मिळते. ‘विंडहंटर’ फ्रंट फेस डिझाइन हे अगदी वेगळे व ठसा उमटवणारे आहे.

मोड्युलर बॅटरी (सीटीपी) टेक्नोलॉजी असल्याने ८०० किमीचा अल्ट्रा लाँग एंड्युरन्सदेखील मिळतो. ती ०-१०० किमी/तास वेग फक्त ३ सेकंदात धारण करण्यास सक्षम आहे. यात ऑटोनॉमस एल३ इंटेलिजंट ड्रायव्हिंग सिस्टिम आहे. एमजी सायबर्स्टर ही केवळ संकल्पनाच नसून, ती लवकरच मोठ्या प्रमाणावर उत्पादित होण्याची अपेक्षा आहे.

टेस्ला मॉडेल ३: टेस्लाने अखेर बहु प्रतीक्षित कारची पहिली आवृत्ती उत्पादित केली. हे प्रीमियम रेंज मॉडेल, ४४,००० डॉलर मध्ये उपलब्ध असून ५०० किमी/३१० मैलांपर्यंत पोहोचते. या रेंजमध्ये प्रथमच एवढी किफायतशीर किंमत देण्यात आली आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक कारचा काळ अधिकृतरित्या आला आहे, हे नक्कीच म्हणता येईल.

वोल्वो एक्ससी४० रिचार्ज: वोल्वोने पहिली पूर्ण इलेक्ट्रिक एक्ससी४० रिचार्ज कार ऑक्टोबर २०१९ मध्ये आणली असून त्यात अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. गूगलच्या नव्या अँड्रॉइड ऑटोमेटिव्ह सॉफ्टवेअर सपोर्टेड इन्फोटेनमेंट सिस्टिमही यात आहे. टेस्लाकडून प्रेरणा घेत, वोल्वोने तयार केलेली ही पूर्ण इलेक्ट्रिक कार बाजाराला धक्का देऊ शकते. रेंज: ४०० किमी / २५० मैल. किंमत: ४५,६०० डॉलर(अंदाजे)

ऑडी ए९ ईट्रॉन (प्राथमिक नाव): २०१८ मध्ये ऑडी एसयूव्ही लाँच केल्यानंतर ऑडी पूर्णपणे इलेक्ट्रिक लक्झरी सेडान २०२४ पर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे. ए९ ईट्रॉन हे ऑडीचे कॉम्बॅट टेस्लाचे मॉ़डेल एस आहे. या कारमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंगचीही सुविधा असेल. ऑडीच्या प्रमुखांनी घोषणा केली की, बॅटरीवर चालणाऱ्या सर्व ऑडीकारपैकी २५% कार मालकी घेण्याची कंपनीची योजना आहे.

बीएमडब्ल्यू एक्स३ / बीएमडब्ल्यू ४ सीरीज जीटी: बीएमडब्ल्यूने त्यांच्या आय५ योजना रद्द केल्या असून आता एक्स३ आणि ४ सीरीज जीटीसारख्या इतर सीरीजचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यावर ते भर देत आहेत. बीएमडब्ल्यूच्या कॉम्बॅटनंतर टेस्लाचे मॉडेल ३ हे २०२१ पर्यंत लाँच होण्याचा अंदाज आहे.


Back to top button
Don`t copy text!