
दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । सातारा । भारती फाऊंडेशनच्या वतीने आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती ही ५ ते १५ वयोगटातील मुलांच्यासाठी गणपती बनविण्याची छोटीशी कार्यशाळा रविवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत शाहू उद्यान, गुरुवार बाग, सातारा. येथे होणार असल्याची माहिती भारती फाऊंडेशनचे प्रमुख रविंद्र भारती- झुटिंग यांनी दिली.
मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांचे मातीशी नाते घट्ट रहावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या आधी भारती फाऊंडेशनच्या वतीने कलाकारी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या मनात गणपती बाप्पा बद्दल एक वेगळे आकर्षण असते. गणपतीची मूर्ती करावी अशी सर्व मुलांच्या मनात इच्छा असते. या इच्छेचे रूपांतर कृतीत आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेत साताऱ्यातील बाल कलाकार मंदार लोहार हा गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेत सर्वांना प्रवेश विनामूल्य असून मूर्ती करणेसाठी माती आयोजक पुरवणार आहेत. प्रवेश संख्या मर्यादित असल्याने नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती महेश लोहार व पोपट कुंभार यांनी दिली. नाव नोंदणीसाठी संपर्क : यशवंत घोरपडे ९८२३४४७३४७, दत्ता चाळके ९४२३१३५६३३, विजय मोरे ९८५०८८९३८७.